कन्हान व कांद्री परिसरात जगतगुरु तुकाराम महाराजांना अभिवादन
कन्हान : - कन्हान व कांद्री परिसरात जगतगुरु तुकाराम महाराज यांना बीज निमित्त विविध कार्यक्रमाने विनम्र अभिवादन करण्यात आले .
कन्हान शहरातील संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम मंदिरात बीज निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सर्वप्रथम नागरिकांनी संत तुकाराम महाराज यांचा मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . संत गजानन भजन मंडळ कन्हान चे भगवान लांजेवार, चिरकुट पूंडेकर , गजानन वडे , रमेश गणोरकर , हरिनाथ लेंडे , श्रावण लांजेवार , देवराव गोतमारे , नथ्थुजी चरडे , गुलाब ढोबळे , हीरालाल लुहुरे , पुरूषोत्तम कुंभलकर , मोतीलाल सुर्यवंशी , संगिताबाई कोमटी आदीनी भजन गायन करून दहीहंडी फोडुन दहीकाल्याचा प्रसाद वितरण केले . कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी संत तुकाराम महाराजांना बिज निमित्त मुर्तीस पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ताराचंद निंबाळकर , विठ्ठल मानकर , स्वप्निल मते , शांताराम जळते , मनोहर लुहुरे , गुंडेराव ठाकरे , एकनाथ खर्चे , अशोक ठाकरे , रामराव लुहुरे , हरिष ठाकरे , नामदेव नवघरे , सुधिर घोडके , शकुंतला डोणारकर , नंदा लुहुरे , सुनिता मानकर , रंजनी निंबाळकर , प्रमिला मते , पुष्पा घोडके , लक्ष्मी गडे , लता मेहर , प्रिती मानदाते , निशा फरसोले , मीना मनगटे , शशी सोनबावने आदीसह नगरवासीयांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .
कांद्रीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना अभिवादन
श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे जगतगुरु संत तुकाराम बिज निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . जेष्ठ नागरिक कवडु आकरे , रामाजी हिवरकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .भजन मंडळा व्दारे भजन कीर्तन गायन केले . आरती व प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . या प्रसंगी मारोती आष्टनकर , वासुदेव आखरे , त्रिभुवन सिंह , सुनिल प्रजापती , नथ्थुजी शेंदरे , महिला ऊषा वंजारी , मंगला कामडे , ऊषा वाडीभस्मे , शोभा डाहारे , इंदिरा मंसुहरे , इंदु टेंबरे , मालती वांढरे , दुर्गा आखरे , सुमित्रा किरपान , ऊषा देशमुख सह बाल गोपाळ प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक वामन देशमुख , विजय आखरे , सुरेंद्र पोटभरे , प्रविण हिंगे , प्रविण आखरे , मनोज कश्यप , सेवक भोंडे , सुरेश उमक , अशोक किरपान सह समस्त भाविक मंडळीने उपस्थित राहुन सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या