Advertisement

सामाजिक वनीकरण व जलदिनानिमित्य वनराई बधारयाचे खोलीकरण

सामाजिक वनीकरण व जलदिनानिमित्य वनराई बधारयाचे खोलीकरण

पारशिवनी :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी येथे दिनांक २२/०३/२०२५ ला राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ,वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी ( सा.वनी ) आकाश झेप फाऊंडेशन रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने नवेगाव खैरी येथे जागतीक जल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी निसर्ग मित्रांनी जल है तो कल है या विषयावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

           चित्रकला स्पर्धा मध्ये सहभागी होऊन विविध चित्राच्या माध्यमातून पाणी पाणी वाचविण्याचा संदेश दिला. मागील १७ जानेवारी ला बांधलेल्या पेंच धरण परीसरातील वनराई बधारयाचे खोलीकरण करुन उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्या वन्यजीवांची तहान भागवून वन्य जीवाचे, वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा तसेच पाणी अडवा पाणी जिरवा चा कुतिशील संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने आणि इको क्लबचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

               कार्यक्रमाला वनपाल अनील राठोड, वनरक्षक सुरज चोपडा,वनमजुर बाळकृष्ण ढोके, मनोहर शेंडे, गजानन ढोगे, पा.अरविद दुनेदार,शिक्षक प्रशांत पोकळे, सतीश जूननकर रितेश मैद, मोरेश्वर दुनेदार,रशिद शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.या उपक्रमाला इयत्ता ५ वी ते ९ वी च्या ७६ विद्यार्थी नी उत्सफुरत सहभाग मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाळेचे समस्त कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Deepening of social forestry and water scarcity afforestation

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या