Advertisement

बौद्ध समाज व आंबेडकरवादी यांनी काढला शांती मार्च मोर्चा | महाबोधी बुध्द विहार मुक्ती आंदोलन ला समर्थन

बौद्ध समाज व आंबेडकरवादी यांनी काढला शांती मार्च मोर्चा  | महाबोधी बुध्द विहार मुक्ती आंदोलन ला समर्थन


पारशिवनी तालुका प्रतिनिधी:- महाबोधी बुध्द विहार मुक्ती पारशिवनी येथिल रमाई बुध्द विहार येथुन हजारोंच्या संख्येमध्ये आंबेडकर वादियानी भंते शीलरक्षीत महाथेरो च्या नेतृत्व यामध्ये शांती मार्च मोर्चा काढण्यात आला त्या आधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण करुन समता सैनिक दलाच्या वतीने कमांडर विजय कापसे व महिला कमांडर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला सलामी दिली.

             त्या नंतर विशाल शांती मोर्चा जय भिम च्या घोषणा देत जुना बसस्थानक, बाजार चौक, तहसिल रोड नी शांती मार्च मोर्चा झेंडे,बनर घेऊन नारे देत हा मोर्चा तहसिल कार्यालयांमध्ये पोहचला त्या काही वक्त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन झाल्या नंतर नायब तहसिलदार पागोटे यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. त्या नंतर तहसिलदार सुरेश वाघचौरे यांच्या सोबत चर्चा करुन त्यांना सांगण्यात आले की हे निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि बिहार चे मुख्यमंत्री नितीशकुमार पाठवण्याची मागणी करण्यात आली.

           ‌  बौद्ध गयाचा महाबौधी बिहार बौद्धांच्या हवाली करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा पारशिवनी मध्ये श्रुखलाबद्ध अनशन करण्याचीही चेतावणी देण्यात आली आहे.पुनादास गजभिये, अशोक गणवीर,अरुण वाघमारे, रमेश सोमकुवर, सचिव सोमकुवर, हर्षद गजभिये,डिगाबर खुबाडकर, शांताराम जळते,हरिष भेलावे, समाजसेवक सुधाकर बांगडे, राहुल जोहरे,समता सैनिक दलाचे कमांडर विजय कापसे, महिला कमांडर ललीता गौरखेडे, रंजना गौरखैडे इत्यादी उपस्थित होते.

               कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शंकर वाघमारे, सुनील डोमकी,अमीत मेश्राम, नरेंद्र भिमटे, कल्याण अडकणे,शालु रामटेके , गीता गोडाने,घिगगु खोब्रागडे,सरला बांगडे इत्यादी ने सहकार्य केले. मोर्चा मध्ये काही घटना घडू नये म्हणुन पारशिवनी चे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये पी.एस.आय.पिसे,पि.एस.आय.रामराव पवार,खुपीया विभागांचे पुथवीराज चव्हाण सह कडेकोट बंदोबस्त लावण्यात आले होते. आभारप्रदर्शन पुनादास गजभिये यांनी केले

Buddhist community and Ambedkarites take out peace march | Support for Mahabodhi Buddha Vihar liberation movement

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या