Advertisement

पैशाच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या – मुख्य आरोपी सह तीन अल्पवयीन साथीदार अटकेत!

पैशाच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या – मुख्य आरोपी सह तीन अल्पवयीन साथीदार अटकेत!

१२ तासांत उकल – स्थानिक गुन्हे शाखा व कन्हान पोलिसांची संयुक्त कारवाई

कन्हान : - पैशाच्या व्यवहारातून उफाळलेल्या वादामुळे चार आरोपींनी महेंद्र बर्वे या तरुणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. या हत्येसाठी धारदार शस्त्र व दगडाचा वापर करण्यात आला. ही घटना हरडे ले-आऊट, पानतावने कॉलेजजवळ, मोकळ्या जागेत घडली. रविवारी (२३ मार्च) रात्री ही क्रूर हत्या करण्यात आली, तर सोमवारी (२४ मार्च) सकाळी मृतदेह आढळून आल्यावर प्रकरण उघडकीस आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि कन्हान पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत, अवघ्या १२ तासांत आरोपींना शोधून काढले. मुख्य आरोपी तुषार गुरधे आणि त्याचे तीन अल्पवयीन साथीदार सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

मतक महेंद्र टिकाराम बर्वे (३०) हा सदभावना नगर, कांद्री, कन्हान येथे राहत होता आणि कांद्री नगरपंचायतीत कार्यरत होता. त्याचबरोबर तो काही महिन्यांपासून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आणि वाळू विक्रीचा धंदा करत होता. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास जेवण करून तो बाहेर फिरायला गेला. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने पत्नीने त्याला अनेकदा कॉल केला. प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर हरडे ले-आऊट परिसरात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.

कन्हान पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे पथकासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहणी केली असता, मृतकाचा चेहरा दगडाने ठेचलेला होता आणि धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रक्ताने माखलेले दगड, दारूच्या बाटल्या व डिस्पोजेबल ग्लास आढळून आले, ज्यामुळे आरोपींनी नशेतच हे क्रूर कृत्य केल्याची शक्यता आहे.

सदर घटना गांभीर्याने घेत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्हान पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी केवळ १२ तासांत आरोपींचा शोध घेतला. मुख्य आरोपी तुषार राजेश गुरवे (२३, रा. पिपरी, कन्हान) आणि त्याचे तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सखोल विचारफुस केली असता आरोपींनी पैशाचा व्यवहारातुन महेंद्र बर्वेच्या खुनाची कबुली दिली.

महेंद्र बर्वे आणि आरोपींमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्यातूनच या चौघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. योजनाबद्ध पद्धतीने त्याला रात्री एका मोकळ्या जागेत बोलावून घेतले आणि निर्घृण हत्या केली.

महेंद्रचा विवाह एक वर्षापूर्वी झाला होता. त्याला एक वर्षाची चिमुकली मुलगी असून, तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीत तो होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. महेंद्रच्या क्रूर हत्येने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Brutal murder of a youth over a money dispute – The main accused along with three minor accomplices, was arrested!

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या