निःशुल्क आरोग्य शिबिरात ३९ जेष्ठ , वयोवृद्ध नागरिकांनी घेतला लाभ
कन्हान : - ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपूर (महा.), शेतकरी कष्टकरी महासंघ विदर्भ आणि विवेकानंद सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथे जेष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी विशेष निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराचा ३९ जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला .
ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती . शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी "शिवरत्न" जनसेवा कार्यालयात हे आरोग्य शिबिर पार पडले . प्रख्यात प्राकृतिक चिकित्सक डॉ.विजेता आणि त्यांच्या चमूने या शिबिरात उपस्थित ३९ जेष्ठ नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये रक्तदाब , मधुमेह , नाडी तपासणी यांचा समावेश होता . तपासणीच्या निष्कर्षांनुसार गरजू नागरिकांना आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले .
विशेष म्हणजे या शिबिरात सहभागी होणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घरातून ऑटोरिक्षाने आणण्यापासून ते पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली . तसेच तपासणी झाल्यानंतर सर्व लाभार्थींना नाश्ता आणि चहा देऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात आली . या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजना मध्ये माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव , दिलीप राईकवार , सचिन साळवी , रुपेश सातपुते , पुरुषोत्तम येणेकर , हबीब शेख , गोविंद जुंघरे , संतोष गिरी , राजू गणोरकर , प्रशांत येलकर यांसह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. ग्रामोन्नती प्रतिष्ठाण, शेतकरी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचाराचा लाभ मिळाला. भविष्यात अशाच सामाजिक आणि आरोग्यविषयक सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
39 senior citizens benefited from free health camp
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या