Advertisement

पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत ३०० होळी चे दहन

पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत ३०० होळी चे दहन 

पारशिवनी :-स्थानीय पोलीस स्टेशन अंतर्गत २५० घरगुती होळ्या आणि सामाजिक ५० होळ्याचे दहन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

             तसेच पारशिवनीचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस अधिकारी,२५ पोलीस कर्मचारी, ४ पोलीस महिला कर्मचारी,४५ होमगार्ड पुरुष आणि १८ महिला होमगार्ड यांची बंदोबस्ताकरीता नियुक्ती करण्यात आली होती.

           प्रत्येक गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणुन फिरते पोलीस पथक हि ठेवण्यात आले होते.एवढेच नाही तर प्रत्येक गावामध्ये कडेकोट बंदोबस्त लावुन त्यांच्या वरती देखरेख ही ठेवण्यात आलेली होती.कुठेही अनुचित प्रकार, घटना घडली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

               पारशिवनी पोलीस स्टेशन ला सर्व गावातील पोलीस पाटील आणि जनतेनी सहकार्य करुन होळी हा सण साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सतीश साकोरे पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या