Advertisement

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद सीआरपीएफ जवानांना वाहिली श्रद्धांजली


पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद सीआरपीएफ जवानांना वाहिली श्रद्धांजली


कन्हान : - जम्मु - काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांना कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली .


१४ फेब्रुवारी २०१९ रोजी , जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गा वर सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता , ज्यात ४० भारतीय सुरक्षा कर्मचारी शहिद झाले होते . जम्मू आणि काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा जवळील लेथपोरा भागात हा हल्ला झाला होता .


या दहशतवादी हल्ल्याला शुक्रवार दि.(१४) फेब्रुवारी २०२५ रोजी सहा वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक प्रभाकर रुंघे आणि नवनिर्वाचित सदस्य सौरभ गावंडे यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला आणि स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन शहिद जवान अमर रहे....अमर रहे....अमर रहे असा   जयघोष केला . मंच सदस्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन करुन आणि दोन मिनटाचा मौन पाळुन दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , प्रदीप बावने , सुप्रित बावने , चेतक पोटभरे , सौरभ गावंडे , वेदांत राऊत , जितु धुमाळ , शुभम बावनकर , हितेश राजपुत , अनुराग महल्ले , अर्जुन पात्रे , माहेर इंचुलकर , आशिष राऊत , राजकुमार बावने , मुकुल शिवारकर , कृणाल पोटभरे , साहिल सैय्यद , योगेश चकोले , अनिकेत निमजे , ऋषी देशमुख , अक्षय सुखदेवे , हिमांशु सावरकर , नाना ऊकेकर , सुशील कळमकर , लोकेश दमाहे , सुरज वरखडे , शेखर कुथे , आदित्य बोरकर सह आदि सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या