स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माधवराव पाटील देवसरकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. अध्यक्षस्थानी रेणुका ताई मोरे होत्या. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, प्रदेश संयोजिका सुनीता ताई देवसरकर, मराठवाडा अध्यक्ष ज्योतीताई शिंदे, नेत्र साहेब आघाडी प्रदेशाध्यक्ष गजानन माने, मराठवाडा अध्यक्ष जनार्दन वडवळे, शिल्पाताई शेंडगे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन तिरुपती पाटील भगनुरे, सदा पाटील पुयड, गजानन सोळंके, भारत खडसे, शिवा पाटील शिंदे, शिवा सुरेश लोट, शंकर पानपट्टी, शिवम पोदाडे, देवा पाटील भानेगावकर, निरंजन कदम पंडित पाटील जाधव, अविनाश पाटील हिवराळे, दत्ता पाटील जाधव, माधवराव वडवळे, योगेश घोरबांड, उमेश घोरबांड, राजू पाटील शिंदे व रामदास कदम यांनी केले.
शिवजन्मोत्सव निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून अनेक नागरिकांनी रक्तदान केले. तसेच अन्नदान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये अनेक गरजूंना अन्नदान करण्यात आले. शिवाय समाजातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर ढोल पथकाचे उद्घाटन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात वातावरण शिवमय झाले होते. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगत युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
Tukaram Chawhan
0 टिप्पण्या