Advertisement

पारशिवनी येथिल राधेश्याम बाबांच्या मंदिरामध्ये ताजुदिनबाबाचा जन्म दिवस उत्साहात साजरा


पारशिवनी येथिल राधेश्याम बाबांच्या मंदिरामध्ये ताजुदिनबाबाचा जन्म दिवस उत्साहात साजरा 


पारशिवनी :- येथिल राधेश्याम बाबांच्या मंदिरामध्ये ताजुदिनबाबाचा जन्म दिवस दरवर्षी प्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला.

            दिनांक २५/०१/२०२५ ते दिनांक २८/०१/२०२५ पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ह्या कार्यक्रमा येथिल भक्त तन - मन - लाऊन येणार्या भक्तांची सेवा करीत असतात येथे दरवर्षी हजारो भक्तांन करीता २५ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत सर्व भक्तांन करीता भोजनाची व्यवस्था केली जात असुन त्यामध्ये कुणाकडुन एक रुपया ही घेतला जात नसुन येथे विविध प्रकारचे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी दिले जातात राधेश्याम बाबांचे देवस्थान हे घोगरा रोड वरती असुन ह्या देवस्थाना मधुन कोणीही उपाशी वापस जाऊ नये याचीही काळजी घेतली जाते.

            तसेच जानेवारी ते डिसेंबर पर्यंत होणार या कार्यक्रमाला स्वतः राधेश्याम बाबा च्या मंदिरामधुन खर्च केला जात असल्याची माहिती तालुका प्रतिनिधी यांना प्राप्त झाली.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या