अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री. विठ्ठल रुखमाई,करभाड च्या वतीने पार पडले
पारशिवनी :- अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हे दिनांक २३/०१/२०२५ ला चालु झाले त्या मध्यें हे.भ.प. संदिप गुरव महाराज यांच्या हस्ते कलश स्थापन करण्यात आले.
ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हे.भ.प. प्रविण गुरवे मु. देवी ( ज्ञानेशाची), हे.भ.प. शंकर महाराज निकम मु. सिललेवाडा तसेच काकडा भजन,रामधुन नगर फेरी,श्री.रामायण वाचन,हरिपाठ,हरी किर्तन,श्री.रामायण वाचन हे भजनाचे कार्यक्रम रात्रीला पार पडले.
ह.भ.प. सौ. वंदना भोले किर्तनकार, आळंदीकर यांचे किर्तन दि.२३ जानेवारी २५ ला पार पडले.ह.भ.प.सोपान महाराज काळबांडे मु. मुरतीजापुर,वारकरी भजन मंडळ दि.२४ जानेवारी २५ ला पार पडले,हे.भ.प.मारोती महाराज पातुरकर मु.देवी ज्ञानेशाची दि.२५ जानेवारी २५ ला पार पडले, परमार्ग सेवक किर्तन केसरी दादाराव उके महानुभाव किर्तनकार मु.नेर जि.यवतमाळ दि.२६ जानेवारी २५ ला पार पडले ,ह.भ.प. रामेश्वर महाराज चिपळे मु. रंगारी दि.२७ जानेवारी २५ ला पार पडले,ह.भ.प. प्रितम महाराज भोयर मठाधिपती,जनकेशवर संस्थान साथी जि. वर्धा दि.२८ जानेवारी २५ ला पार पडले,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेंबेकर मु.मोवाड दि.२९ जानेवारी २५ ला पार पडले, तसेच दिनांक ३० जानेवारी २०२५ रोज गुरुवारला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत दिंडी चे कार्यक्रम संपन्न झाले. त्या नंतर पालखी सोहळा संपन्न झाले. नंतर ११ ते १ वाजेपर्यंत ह.भ.प.भुषन महाराज सिगार वाडे मु. शेदुरजनाघट यांचे गोपाल काल्याचे किर्तन पार पडले .
त्या नंतर महाप्रसाद झाले. महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी घेतला असुन मूदगाचाये ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कणसे मु. नाशिक,ह.भ.प.अनिल महाराज भुसारी,अमित महाराज करडभाजने, यशवंत महाराज डहाके, रविंद्र महाराज कडू, रंजन महाराज भुजाडे, शंकर महाराज निकम, रुपचंद महाराज भारद्वाज, तसेच टाळकरी मंडळी ह.भ.प.मोहन महाराज सोनवणे मु. आग्रा व त्यांच्या संच अनिल महाराज गुंरवे व अर्जुन महाराज रुनगे , चोपदार विजु महाराज मु. बानबाकोडा,भारुडाचारय भिमराव महाराज कडु मु. खंडाळा,विणेकरी नत्थु महाराज केणे मु.इसापुर , उदेभान महाराज शेळके मु.धापेवाडा, मुकूंद महाराज धोटे मु.करभाळ, शोभायात्रा व दिंडी मध्ये सहभागी भजन मंडळ करभाळ गावातील महिला व पुरुष भंजन मंडळ,दिगलवाडी, खंडाळा,पारडी, दहेगाव ( जोशी) , पारशिवनी,भागिमाहरी,टेभूरडोह,वाकी, निंबा,इटगाव, सोनेगाव,पेढरी, गोरखपुर,सावळी,पालोरा, कोच्ची, बोरगाव ( धु) इसापुर, सोनेगाव,गुढरी,नयाकुळ इत्यादी भजन मंडळ उपस्थित होते.
गोपाळ काल्याचे किर्तन संपल्या नंतर महाप्रसादाचे कार्यक्रम चालू झाले त्यांचा लाभ उपस्थित असलेल्या भक्तांनी आणि बाहेरु आलेल्या भक्तांनी घेतले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अथक प्रयत्न केले अनील मेघर,विजय उपासे, भास्कर भकते मकरंद मेघर, देविदास वाढरे,विलास बुरसे,किष्णा गुरदे, बंडु धुडे,जैन मेघर, पांडुरंग लोहकरे,हरिष वाढरे इत्यादी नी सहकार्य केले.
सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी
0 टिप्पण्या