कन्हान , कांद्री परिसरात "श्री" च्या पायी पालखी दिंडी यात्रेचे जल्लोषात स्वागत
भजन, अंभग च्या निनांदाने कन्हान, कांद्री शहर दुमदुमले
कन्हान ला भक्तीमय वातावरणात नवीन वर्षाला सुरूवात
कन्हान : - श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपुर व्दारे संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले .
शुक्रवार (दि.०३) जानेवारी ला श्री संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रा टिमकी तीन खंबा चौक नागपुर श्री हरिहर गजानन निवास येथुन प्रस्थान होऊन कामठी मार्गे सायंकाळी ६ वाजता कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर येथे पालखीचे आगमन होताच मॉ काली माता मंदीर सेवा ट्रस्ट, सत्रापुर कन्हान व्दारे भव्य स्वागत करण्यात आले . सायंकाळी ७ ते ८.३० वाजता किर्तन व नंतर महाप्रसाद आणि मुक्काम करण्यात आला .
शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ७ वाजता पालखी काली मंदीरातुन प्रस्थान होऊन राष्ट्रीय महामार्गाने गणेश नगर , हनुमान नगर , गजानन मंदीर तिवाडे ले-आऊट येथुन पांधन रोडने आंबेडकर चौकातुन महामार्गा ने नगर प्रदक्षिणा करित श्री गजानन सॉ मिल काकडे निवास येथे चाय नास्ता करून महामार्गा ने तारसा रोड चौक , शितला माता मंदीर जे एन रोड येथे स्वागत नंतर कांद्री वरून जे एन दवाखाना चौकातुन रूद्रा पेट्रोल पंप येथे अल्पोहार करून बोरडा - नगरधन मार्गे रामटेक कडे रवाना झाले .
श्री गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रा कन्हान, कांद्री शहर भ्रमण करतांना महिलांनी रांगोळी , फुल व आरती घेऊन पुजन केले व परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले . अनेक ठीकठिकाणी भाविकांनी , विविध सामाजिक संघटन आणि मित्र परिवारा द्वारे बिस्किट , फराळी पॉकेट , बुंदीचे लाडु , भेट वस्तु देऊन पालखीचे जल्लोष स्वागत केले . बोरडा रोड वरील रूद्रा पेट्रोल पंप येथे अल्पोहार , भेट वस्तु वितरण करून स्वागत केले . त्यानंतर पालखी बोरडा रोड ने पुढे मार्गक्रमण करून सायंकाळी नगरधन येथे मुक्काम होणार करण्यात आला . आज रविवार ला रामटेक येथे आगमन आणि उद्या सोमवार ला गोपाल काल्याचे किर्तन व समापन होऊन पालखी यात्रा नागपुर करिता परत होईल . या पालखी यात्रेत मोठ्या संख्येने भाविक मंडळी सहभागी होऊन "श्री" दर्शनाचा लाभ घेतला .
"Shri"'s Palkhi Dindi Yatra welcomed with joy in Kanhan, Kandri area | कन्हान , कांद्री परिसरात "श्री" च्या पायी पालखी दिंडी यात्रेचे जल्लोषात स्वागत
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या