भीमा कोरेगाव शौर्य दिनी पाचशे शुरवीरांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण
कन्हान : - भीमा कोरेगाव विषमतेच्या विरुद्ध समता व समानता करिता पाचशे महार योद्धा वीरांनी २८ हजार पेशवाई सैनिकांना पराजित केले होते . त्या शौर्य दिवसाच्या स्मरणार्थ कन्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महार बटालियन आणि समता सैनिक दल च्या वतीने पाचशे शुरवीरांना विनम्र अभिवादन करून श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली .
बुधवार ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सी एस लामा भन्ते यांचे हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमाचे मुख्य संचालन महार सैनिक जय पाटील यांच्या नेतृत्वात कन्हान , कामठी , नागपुर चे माजी महार सैनिकांनी पाचशे शुर महार विरांना मान वंदना आणि सलामी देऊन विनम्र अभिवादन केले .
महार बटालियनच्या शूर महार सैनिकांनी परेड करून एक एकाने पुष्पचक्र भीमा कोरेगाव शौर्य स्तंभा च्या प्रतिमेस अर्पित करून ५०० भीमा कोरेगाव महार सैनिकांना महार सैनिक जयवंत गडपायले , जय पाटील , विलास मेश्राम , सम्राट पगारे , पंजाबराव पाटील , पद्दमाचंद पंचभाई , उत्तम मेश्राम , अशोक बन्सोड , विश्व राज हाडगे , मुकेश सोनेकर , राजकुमार पाटील , नागसेन मानकर , दिलीप गेडाम , धनराज चोरपगार , प्रभाकर शिरसाट , धर्मशील सोंनडवले , चंद्रशेखर चहांदे , संजय सोनोने , संतोष शिरसाट , मोहन गावंडे , शिवपाल वाघमारे , रोशन मेश्राम , रमाकांत पानतावणे आदीनी पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली .
या प्रसंगी कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व समता सैनिक दलाच्या सिंधुताई वाघमारे , सुशील कळमकर , तुळ जाबाई रामटेके, प्रमिला घोडेस्वार , अनिता दुपारे , कल्पना फुलझले आदीनी सुध्दा पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले . महार बटालियन सैनिक आणि समता सैनिक दल द्वारे भीमा कोरेगाव शौर्य दिवसाच्या स्मरणार्थ क्रांती ची मशाल प्रज्वलित करून अखंड १२ तास ठेऊन ५०० शुरवीर भीमा कोरेगाव महार पराक्रमी सैनिकांना अभिवादन करण्यात आले . मशाल कार्यक्रमाचे आयोजन रॉबिन निकोसे व राजेंद्र फुलझले यांनी केले होते . या मानवंदना अंततः दोन मिनिट मौनधारण करून शोककुल बीगुल वाजवुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
महार सैनिक विलास मेश्राम द्वारे वर्ड ऑफ कमांड देऊन शूरवीर ५०० भीमा कोरेगाव महार सैनिकांना महार गान व सलामी देत श्रद्धांजली अर्पित केली . यावेळी के.एस लामा भंतेजी द्वारे आयोजित सत्कार समारंभात महार बटा लियन चे महार सैनिक व समता सैनिक दल आणि उपासक , उपासिका तसेच सामाजिक कार्यकर्ता ला स्मृतीचिन्ह देत सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमास उपासक भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, दौलत ढोके, मनोज गोंडाणे, राजेश फुलझले, चेतन मेश्राम, आदित्य टेंभुर्णे, रोहित मानवटकर, नरेश चिमणकर, रतनदीप, पंकज रामटेके, अभिजीत चांदुरकर, नितेश मेश्राम, विवेक पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
सर्वधर्म समभाव संघटन द्वारे पाचशे शुरवीरांना श्रद्धांजली
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे भीमा कोरेगाव शौर्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष चंदन मेश्राम , नगरसेविका रेखा टोहणे , समाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भीमा कोरेगाव शौर्य स्तंभा च्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली . राजन विनायवार पांडेजी , सदरे आलम , नगरसेवक राजेश यादव यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात दोन मिनटाचे मौन धारण करुन ५०० शुरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली . या प्रसंगी उमेश यादव , दिपक तिवाडे , नितिन मेश्राम , अक्षय फुले , अविनाश हातागडे , कुंदन रामगुंडे सह आदि नागरिक उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या