Advertisement

पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत जनजागृती चे कार्यक्रम राबविण्यात येत आहे | Public awareness program is being implemented under Parshivani Police Station


पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत जनजागृती चे कार्यक्रम राबविण्यात येत आहे | Public awareness program is being implemented under Parshivani Police Station


पारशिवनी :- दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत नयाकुळ येथिल सुर्य आंबा स्पिनिंग मिल लिमिटेड येथे महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या उपक्रमा अंतर्गत संपुर्ण देशामध्ये लागु झालेल्या नविन तीन कायद्याबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

              शिबिरा मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक विभाग रामटेक,सपोनी मस्कर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण, पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात पोलीस स्टेशन पारशिवनी, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने, गौतम एच.आर. सूर्याबा स्पिनिंग मिल लिमिटेड हे उपस्थित होते.

            सदर कार्यक्रमा मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनामध्ये सपोनी मस्कर यांनी नवीन तीन कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन करून हे नवीन तीन कायदे काळानुरूप कसे जनतेच्या हिताचे असुन जनतेचे रक्षण करणारे, जनतेला न्याय मिळवून देणारे आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमा मध्ये सूर्यबा स्पिनिंग मिल चे कर्मचारी तसेच स्थानिक गावकरी, पोलीस पाटील उपस्थित होते.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या