आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्य साधुन पत्रकार दिवस थाटात साजरा
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - कन्हान शहर विकास मंच द्वारे दर्पणकार मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 213 व्या जयंती चे औचित्य साधुन जागतिक पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.एस मालवीय , प्रमुख पाहुणे कन्हान मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.सुर्यभान फरकाडे , जेष्ठ पत्रकार चंद्रकुमार चौकसे , संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे सह आदि मान्यवरांचा हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पत्रकार बंधुना डायरी , पेन आणि पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले . कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांनी आणि शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सदस्य प्रदीप बावने आणि आभार अर्जुन पात्रे यांनी केले .
या प्रसंगी लोकल अॅप नागपुर जिल्हा प्रतिनिधि उमेश फुलबेल , पत्रकार सुनिल सरोदे , दिनेश नानवटकर , धनंजय कापसीकर , कमलसिंह यादव , सतिश घारड , जयंत कुंभलकर , रमेश गोडघाटे , आकाश पंडितकर , निलेश गाढवे , भारत पगारे , विवेक पाटील , रोहित मानवटकर सह आदि पत्रकार बंधु प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , माहेर इंचुलकर , राजेंद्र बावनकुळे , कैलास डाले , उमेश मेश्राम , रोशन जामदार , अजय चव्हान , लोकेश दमाहे , प्रफुल देऊळकर , नाना ऊकेकर , योगेंन्द्र आकरे , राहुल सोनबरसे सह आदि मंच सदस्यांनी सहकार्य केले .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्य साधुन पत्रकार दिवस थाटात साजरा | Journalists' Day celebrated with pomp on the occasion of the birth anniversary of Acharya Balshastri Jambhekar
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या