Advertisement

सितापुर(पवनी) येथे गोवारी शहीद स्मारकाचे भूमिपूजन


सितापुर(पवनी) येथे गोवारी शहीद स्मारकाचे भूमिपूजन


रामटेक : - १४ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या न्याय व हक्काच्या मागणी करिता काढलेल्या मोर्च्यावर लाठीचार्ज मध्ये शहीद झालेल्या गोवारी समाज बांधवांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सितापुर (पवनी)येथे शहीद स्मारकाचे भूमिपूजन बुधवार ला आदिवासी गोवारी(गोंड गोवारी) फाऊंडेशन , रामटेक चे सितापुर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र भोंडे यांच्या हस्ते पार पडले . यावेळी गोवारी समाजातील ११४ शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


या प्रसंगी आदिवासी गोवारी(गोंडगोवारी)फाऊंडेशन,रामटेक चे उपाध्यक्ष मनोहर सोनवाने , सदस्य रवींद्र कोहळे , बाळू सोनवाने , ग्राम पंचायत सदस्य सैलेश उईके , सतीश वाडीवे , पोलीस पाटील रमेश वलोकर , शाखा उपाध्यक्ष अनिकेत सोनवाने , सचिव मंगेश दुधकवरे , कोषाध्यक्ष आश्विन दुधकवरे , सुनील नेवारे , संतोष कोहळे , मनोज ठाकरे , देवचद दुधकवरे , भावराव भोंडे , शुभम शेंद्रे , विजय दुधकवरे , ईश्वर दुधकवरे , संजय सोनवाने , बाळकृष्ण दुधकवरे , देवचंद भोंडे , उमेश दुधकवरे , गणेश राऊत , अभिषेक सोनवाने , देशराज दुधकवरे , सचिन दुधकवरे , वैशाली शहारे , सीमा नेवारे , मनीष दुधकवरे , कांता दुधकवरे , बनु भोंडे , अनिता ठाकरे , गीता राऊत , प्रतिभा दुधकवरे , लक्ष्मी सोनवाने , पूनम दुधकवरे ,सरिता दुधकवरे , सीता भोंडे , मेघा भोंडे , शालू भोंडे , अशोक ठाकरे , बापूराव अंबाडारे यांचा सह गावातील गोवारी समाजातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या