Advertisement

दारुड्या पतीने पत्नीच्या पाठीवर धारदार चाकूने वार करून केला खून


दारुड्या पतीने पत्नीच्या पाठीवर धारदार चाकूने वार करून केला खून

नववर्षाच्या पूर्व संध्येला चनकापूर परिसरात घडली घटना

आरोपी पतीच्या डीबी पथकाने आवळल्या मुसक्या

वाद विकोपाला जाताच एका दारुड्या पतीने पत्नीच्या पाठीवर धारदार चाकूने सपासप वार खून केल्याची घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील चनकापूर वार्ड क्रमांक २ परिसरात घडली असून खापरखेडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे पसार झालेल्या आरोपी पतीच्या पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

मृतक पत्नीचे नाव हेमलता सिद्धार्थ गेडाम वय ४२ रा एपी बियर बारच्या मागे वार्ड क्रमांक २ चनकापूर असे आहे तर आरोपी पतीचे नाव सिद्धार्थ गुणाजी गेडाम वय ४५ असे आहे.

आरोपी सिद्धार्थ गेडाम हा मूळचा बाबूळखेडा येथील रहिवासी असून त्याला मृतक पत्नी हेमलता व दोन मुले एक मुलगी आहे आरोपी सिद्धार्थचा एक मुलगा व एक मुलगी बाबूळखेडा येथे राहतात आरोपी सिद्धार्थ सिव्हिल मिस्त्रीचे काम करतो घटनेच्या दिवशी ३१ डिसेंबर मंगळवारला आरोपी सिद्धार्थचा मुलगा वैभव याने घरी चिकन आणले होते वैभवची आई मृतक हेमलता पोळ्या करत होती तर वैभव पोळ्या शेकत होता यादरम्यान जवळपास ९.३० च्या सुमारास आरोपी सिद्धार्थ हा दारू पिऊन मृतक हेमलता सोबत कोणतेही कारण नसतांना वाद घालत होता यावेळी काही कळण्याच्या आत मृतक हेमलताच्या पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले 

यावेळी वैभव हा आपल्या आईला वाचविण्यासाठी धावला तिच्या तोंडातून व पाठीतून रक्त वाहत होते जवळच राहत असलेल्या मित्राच्या घरी गेला आई हेमलताला रुग्णालयात नेण्यासाठी कार आणली शिवाय घटनेची माहिती खापरखेडा पोलीसांना देण्यात आली पोलीस येत असल्याचे पाहून घटनास्थळावरून पसार झाला खापरखेडा पोलीसांनी घटनास्थळ गाठून हेमलताला चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला पसार झालेल्या आरोपी सिद्धार्थचा खापरखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या डीबी पथकाने शोध घेतला असता झाडी झुडपात लपून बसलेला आढळला.


खापरखेडा पोलीसांनी आरोपी सिद्धार्थ याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे १ जानेवारी बुधवारला बाबूळखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


pratinidhi - satish sakore

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या