आदित्य जैन व निशी जैन याना दिल्लीत प्रजासत्ताक दिनी परेडचे विशेष निमंत्रण
वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी विशेष बैठक आणि सादरीकरण.
कन्हान : - आदित्य कलेक्शन कन्हान चे श्री आदित्य जैन व श्री आदिविद्या हँडलुम प्रोजेक्ट प्रोड्युसर कंपनी कन्हान संचालिका निशी जैन यांना प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मानाने दिल्ली येथे आयोजित परेड मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण आले आहे . त्यांच्या नेतृत्वात हातमाग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान आणि ग्रामिण भागात रोजगार निर्मिती करिता हे निमंत्रण देण्यात आले आहे .
श्री आदित्य च्या कंपनीचा ब्रँड तंतु , ज्याचा अर्थ "कापसाचा सर्वात लहान कण" आहे . या तत्त्वज्ञानावर आधारित आहे की , ज्या प्रमाणे लहानतंतु एकत्र येऊन कापड तयार करतात , त्याचप्रमाणे छोटे प्रयत्न एकत्रितपणे मोठ्या यशात बदलु शकतात . या दृष्टिकोनातुन श्री आदिविद्या हातमाग प्रकल्प संस्थेला ग्रामिण भागात आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे केंद्र बनवत आहे . आदित्य जैन आणि पारस जैन यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प केवळ अल्पसंख्याक आणि ग्रामिण समुदायांनाच रोजगार देत नाही तर भारतातील पारंपारिक हातमाग कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे काम करत आहे . कंपनीने आता पर्यंत शेकडो विणकर व कारागिरांना त्यांच्या कलेची योग्य किंमत मिळवुन देण्यासाठी मदत केली आहे .
विशेष बैठक आणि सादरीकरण
प्रजासत्ताक दिना व्यतिरिक्त आदित्य जैन आणि पारस जैन यांना वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांच्या सोबत विशेष बैठक आणि सादरी करणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे . या बैठकीचा उद्देश हातमाग क्षेत्रातील त्यांची यशोगाथा शेअर करणे व त्यांचे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर राब विण्याच्या मार्गांवर चर्चा करणे हा आहे . आदित्य जैन यांचा दृष्टीकोन असा की , “TANTU " चा उद्देश परंपरा आणि आधुनिकता यांच्यात एक सेतु निर्माण करणे आहे . आमच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे .
तंतु ब्रँड एक प्रतिक
तंतु ब्रँड हे केवळ एक नाव नाही तर एक विचार धारा आहे . ज्या प्रमाणे कापसाच्या सर्वात लहान कणा ने मोठे कापड तयार केले. तसेच कारागिरांचे छोटे प्रयत्न आणि योगदान मोठे बदल घडवुन आणु शकतात . या मूळ मंत्रासह कंपनी केवळ ग्रामिण भारतातच रोजगार उपलब्ध करून देत नाही , तर भारतीय हातमागांना जागतिक व्यासपीठावर ओळख देण्याचे काम करत आहे .
प्रजासत्ताक दिनी गौरव हा आदित्य जैन आणि पारस जैन यांची ही कामगिरी केवळ नागपुर करिताच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी अभिमाना ची बाब आहे . त्यांची यशोगाथा हा संदेश देते की, योग्य दिशेने प्रयत्न केले तर पारंपारिक उद्योगांनाही आर्थिक विकासाचे माध्यम बनवता येईल.
Aditya Jain and Nishi Jain special invitation to Republic Day Parade in Delhi
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या