Advertisement

पारशिवनी येथे बेरोजगारी विषयी शिबिर पार पडले

पारशिवनी येथे बेरोजगारी विषयी शिबिर पार पडले 


पारशिवनी :- येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्टाहाऊस मध्ये दिनांक १८/१/२०२५ रोज शनिवार ला दुपारी 12 वाजेला बेरोजगारी विषयी मार्गदर्शन शिबिर चालू झाले. त्या मध्ये आकाश नाटकर यांनी बेरोजगारांना आणि विद्यार्थ्यांना बेरोजगारी विषयी माहिती दिली.

             त्या मध्ये नाटकर म्हणाले की इकडे तिकडे न भटकता उद्योजक बना किंवा कोणत्याही एका कम्पनी चे काम करा म्हणजे आपल्या कडे दोन पैस्याची आवक येईल आणि आपले खर्च त्या वरती चालू राहील आपण कोणावरही अवलंबून राहणार नाही.आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.कि आज आपण नोकरी च्या शोधामध्ये असल्यानंतर ही नौकरी मिळेल हे निश्चित नाही, आणि मिळाली तर ती सरकारी मिळेल का ठेकेदारी मध्ये मिळेल हे निश्चित नाही. 

म्हणून आपण कोणत्या ही एका कम्पनी चे काम काम जर केले तर आपणास चांगली इकम मिळेल आणि आज रोबोट आलेले आहेत फोरहिरल गाडी हि बिना ड्रायव्हर नी म्हणजे सेन्सर नी चाल आहे.बघा जग किती बदलतं आहे.येणारया दहा ते पंधरा वर्षां मध्ये नौकरया राहणार नाही. तर आपण काय करणार या व्यतिरिक्त आणखी मोलाचे मार्गदर्शन करुन कार्यक्रम  पार पडले तसेच गायत्री सायरे चा वाढदिवस हि साजरा करण्यात आला कार्यक्रमा करीता विशेष उपस्थित नेहा केळवदे,नदीनी गजबे, गायत्री सायरे, कमलाकर बंड, सतीश साकोरे उपस्थित होते.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या