नागपूर ते मुंबई जाणाऱ्या सुपर एक्सप्रेस ला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्याची मागणी
पारशिवनी :- महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी त्याग घडवुन व्यसन मुक्ती केली असून जे लोक व्यसनाधीन होते त्यांना चांगला मार्ग दाखवुन परमात्मा एक मार्गामध्ये घेऊन त्यांचे व्यसन, दुःख, आणि उध्वस्त झालेले परिवार हे ह्या मार्गामध्ये आल्याने ते दुरुस्त झाले.
आज ते सुखी समाधानी असुन कोणी सेवक नागपूर टिमकी, कोणी सेवक वर्धमान नगर, कोणी मौदा, कोणी पालोरा, कोणी रामटेक तर मोहाळी कश्याप्रकारे सेवकांनी मार्गामध्ये येऊन कार्य घेऊन आज सुखी समाधानी असल्याने आज परमात्मा एक मार्गामध्ये लाखों सेवक असुन दिवसेंदिवस आज सेवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे गावा- गावातील सेवकान मध्ये नागपूर वरुन मुंबई ला जाणार या सुपर एक्सप्रेस ला किंवा रामटेक वरुन मुंबई सुपर एक्सप्रेस टेरेन सुरू करुन तीला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव ताबडतोब देण्याची मागणी परमात्मा एक च्या सेवकानी आणि जनतेनी केलेली असुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल आणि रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना मध्ये उचलुन परमात्मा एक सेवकांना न्याय देण्याची मागणी जनतेनी केलेली आहे.
पारशिवनी प्रतिनिधी: सतीश साकोरे
0 टिप्पण्या