Advertisement

ट्रायसायकल आणि वॉकिंग स्टिक्स वाटप करुन जागतिक अपंग दिवस साजरा |Celebrate International Day of Persons with Disabilities by distributing tricycles and walking sticks


ट्रायसायकल आणि वॉकिंग स्टिक्स वाटप करुन जागतिक अपंग दिवस साजरा

कन्हान  : - कन्हान शहरातील आंबेडकर चौक येथे जागतिक अपंग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे , प्रमुख अतिथि नगर परिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर सह आदि मान्यवरांचा हस्ते यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 


यावेळी मान्यवरांनी अपंग बांधवांना शासनाच्या विविध योजनेची माहिती देऊन ट्रायसायकल आणि वॉकिंग स्टिक्सचे वाटप केले . या प्रसंगी वैद्यकीय प्रभारी हंसराज ढोके , रिंकेश चवरे , मनिष भिवगडे , अजय लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन अश्विन भिवगडे यांनी केले . सुत्र संचालन चेतन मेश्राम आणि आभार प्रदर्शन नितिन मेश्राम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोहित मानवटकर , आनंद चव्हान , पुरुषोत्तम रोडेकर , संदीप चिंचोलवार , बलवंत पात्रे , योगेश पात्रे , रंगराव ठाकरे , शुभम मेश्राम सह आदि ने सहकार्य केले .

ट्रायसायकल आणि वॉकिंग स्टिक्स वाटप करुन जागतिक अपंग दिवस साजरा |Celebrate International Day of Persons with Disabilities by distributing tricycles and walking sticks

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या