सुगंधीत तंबाखु वाहतुकी वर कन्हान पोलीसांचा दंडा
दोन आरोपी अटक , ८७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : - सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या मोपेड चारचाकी वाहन ला कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने पकडुन दोन आरोपींना अटक करुन ४७ सुगंधित टिनाचे डब्बे आणि मोपेड वाहना सह एकुण ८७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.२२) नोव्हेंबर ला दुपारी कन्हान पोलीस डीबी पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि कामठी कडुन दोन इसम एका पांढऱ्या रंगाचा मॅस्ट्रो मोपेड वाहन क्रमांक एम एच ४० ऐजे ०४४६ ने प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु घेऊन कन्हान कडे येत आहे .
अश्या माहिती वरुन कन्हान पोलीसांनी जुने पोलीस स्टेशन कन्हान च्या बाजुला रोडावर नाकाबंदी करुन मॅस्ट्रो मोपेड वाहनाला थांबवुन पाहणी केली असता दोन पिशव्यात सुगंधीत तंबाखु चे ४७ टिनाचे डब्बे मिळुन आले . कन्हान पोलीसांनी आरोपी १) जकाउर लतीफ शेख (वय ३९) २) विवेक गुप्तपाल मेश्राम (वय ३६) यांना अटक करुन त्याचा जवळुन ४७ सुगंधित टिनाचे डब्बे आणि मोपेड वाहन असा एकुण ८७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , हरिष सोनभद्रे , महेश बिसेन , अमोल नागरे , अश्विन गजभिए , आकाश सिरसाट सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या