Advertisement

मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांना अभिवादन |abhiwadan to the great saint Jagannade Maharaj

मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

संताजी ब्रिगेड महिला क्रांती कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन 

कन्हान : - संताजी ब्रिगेड महिला क्रांती कन्हान शहर द्वारे संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले .

मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्त संताजी ब्रिगेड महिला क्रांती कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन संताजी मंगल कार्यालय येथे संताच्या मंदिरात करण्यात आले . संस्थेचे अध्यक्ष सौ.मीना कळंबे ,  जिल्हा परिषद सदस्य व्यकटेश कारेमोरे , अमोल साकोरे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज , विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी रंजनी किरपान , सुषमा मस्के , सुनंदा दिवटे , सुनिता लिल्हारे , यांनी संत जगनाडे महाराज यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज , विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . मिठाई वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश कळंबे यांनी केले.

या प्रसंगी नगरसेविका सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , सुनिल लाडेकर , विनोद किरपान , शैलेश शेळकी , मयुर माटे , ऋषभ बावनकर , महेंद्र साबरे , रिंकेश चवरे , सचिन वासनिक , संजय रंगारी , राजेंद्र शेंदरे , आकाश वाडणकर , निलकंठ मस्के , इंदल यादव , सौरभ डोणेकर , मनोज कुरडकर , चंदु पानतावने सह आदि नागरिक उपस्थित होते.

मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांना अभिवादन |abhiwadan to the great saint Jagannade Maharaj

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या