Advertisement

खंडाळा (घटाटे) शिवारात एकाच रात्री दोन घरफोडी | Two house burglaries in one night in Khandala (Ghatate) Shivara


खंडाळा (घटाटे) शिवारात एकाच रात्री दोन घरफोडी


ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण , पोलीसात गुन्हा दाखल 

दिवसा आणि रात्री पोलीस ग्रस्त वाढविण्याची ग्रामस्थांची चर्चेतुन मागणी

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा (घटाटे) शिवारात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी च्या घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे  . चोरट्यांनी एकुण १,७६,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने 
ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार १३ डिसेंबर ला फिर्यादी धनराज चकोले (वय ४७) रा.खंडाळा हे कुंटुंबीयांसह साळीच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले होते . १४ डिसेंबर ला वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडुन तेथेच मुक्काम केला . १५ डिसेंबर ला सायंकाळी घरा जवळील शेजाऱ्याने धनराज यांना फोन करुन घरी चोरी झाल्याचे सांगितले . तेव्हा त्यांनी घरी पोहचुन पाहणी केली असता चोरट्यांनी सोन्या , चांदीचे दागिने , रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकुण १,३६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला .


दुसऱ्या घटनेत फिर्यादी अल्हा प्रमोद गोरे (वय ५०) रा.खंडाळा १३ डिसेंबर ला मुलीला भेटण्यासाठी तिच्या सासरी भंडारा येथे गेल्या होत्या . १५ डिसेंबर ला वहिनी सुषमा घारड रा.खंडाळा यांनी अल्हा गोरे यांना फोन करुन घरी चोरी झाल्याची माहिती दिली . अल्हा गोरे यांनी घर गाठुन पाहणी केली असता घरातील सामान अस्थवस्थ स्थितीत पडलेला अवस्थेत दिसुन आले . चोरट्यांनी शेतीपयोगी , संसारपयोगी साहित्य , कपडेलत्ते आणि रोख रक्कम असा एकुण ४०,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला .

एकाच रात्री चोरट्यांनी दोन घर फोडुन एकुण १,७६,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेनंतर गावात दिवसा आणि रात्री पोलीस ग्रस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या