५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजना संदर्भात सहविचार सभा
सुरगाणा पंचायत समिती शिक्षण विभाग व गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ - २०२५ मध्ये संपन्न होणार्या ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजना संदर्भात नुतन विद्यामंदिर सुरगाणा येथे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीम. अल्पा देशमुख मॅडम यांच्या अध्यतेखाली सहविचार सभा संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी तथा विज्ञान प्रदर्शन समन्वयिका मा. श्रीमती डॉ नेहा शिरोरे मॅडम, मा. श्रीमती शेडगे मॅडम, मा. श्री. नरेंद्र कचवे साहेब, मा. श्री. नेहे साहेब, सुरगाणा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष मा. श्री. कासार सर, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे प्रतिनीधी मा. श्री. बाळासाहेब जगझाप सर, मा. श्री. सुभाष सोनवणे सर, मा.श्री. विक्रमजी राठोड सर, सुरगाणा एनडीएसटी संचालक तथा उंबरपाडा शाळेचे प्राचार्य मा. श्री. देवरे सर हे उपस्थित होते.
होवु घातलेल्या विज्ञान प्रदर्शन संदर्भात श्रीमती देखमुख मॅडम यांनी उपस्थित मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांना प्रदर्शनाचा मुख्यविषय व त्याअनुषंगाने उपविषय व माॅडेल कसे असावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. कासार सर यांनी विज्ञान प्रदर्शन संदर्भातील राज्य व जिल्हा संघाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना उपस्थितांना दिल्या.
प्रदर्शन संदर्भातील विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. ह्या वर्षाचे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजकत्व आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा हतगड या शाळेला देण्यात आले. आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री. रत्नाकर गावित सर यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन विज्ञानमिञ विक्रम राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र पगार सर यांनी केले.
सहविचार सभेसाठी सर्व केंद्राचे केद्रप्रमुख, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी - किशोर जाधव सुरगाणा/नाशिक
0 टिप्पण्या