Advertisement

वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उपक्षेत्र परिसरात गीधड पक्षी आढळला


वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उपक्षेत्र परिसरात गीधड पक्षी आढळला


लुप्त होत असलेल्या गीधड पक्षाला तरुणांनी दिले जीवनदान


कन्हान : - कन्हान परिसरातील वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उपक्षेत्र अंतर्गत कार्यरत खाजगी सुरक्षा रक्षक परिसरात पेट्रोलिंग करित असतांना त्यातील वाईल्ड वेल्फेयर सोसायटी कन्हान चा सदस्य आशिष मेश्राम याच्या लक्षात आले की , परिसरात गिधड हा मोठा पक्षी आहे . त्यानी आपल्या सहकार्याच्या मदतीने त्या मोठया पक्षाला पकडुन वन विभागाच्या सहकार्याने टीटी सेंटर नागपुर हयांच्या स्वाधिन करून लुप्त होत असलेल्या गीधड पक्षाला जीवनदान दिले .



गुरुवार (दि.२८) नोहेंबर २०२४ ला रात्री १० वाजता दरम्यान वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उपक्षेत्र परिसरात सब स्टेशन जवळ वेकोलि खाजगी सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करतांना एक मोठा विशालकाय पक्षी त्यांच्या निदर्शनात आला . तेव्हा तिथे पेट्रोलिंग रक्षका मध्ये एक वाईल्ड वेल्फेयर सोसायटी कन्हान चा सदस्य आशिष मेश्राम वेकोलि मध्ये खाजगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करित असल्याने त्यांनी त्या पक्ष्या ला ओळखले आणि आपल्या टीम च्या पूर्ण सदस्यांना सांगितले . वेळ न गमावता सदस्य लगेच कोळसा खदान परिसरात पोहोचले तिथे त्याना एक मोठे गीधड़ पक्षी दिसला आणि त्याच्या शरीराला ट्रैकर लागले असल्याने लगेच त्यांनी वनविभाला संपर्क साधुन माहिती दिली . गीधड़ हे कोळसा खुली खदान मध्ये जाऊन अपघात होऊ शकते व तिथे तो मृत्यु मुखी सुध्दा पडु शकतो अशी आशंका बाळगता सदस्यांनी त्याला सुखरूप रित्या पकड़ले व वनविभागाच्या मार्फ़त त्याला ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर नागपुर याच्या सुपुर्द करून लुप्त होत असलेल्या गीधड पक्षा ला जीवनदान दिले . 

या प्रसंगी वाइल्ड लाइफ वेलफ़ेयर सोसाय टी कन्हान चे चंद्रशेखर बोरकर , आशिष मेश्राम , बबलू मूलुंडे , वन विभाग व टी टी सेंटर आणि प्राणी मित्र रोहित फ़रकसे , गुड्डू नेहाल , अंकेश , दीपक , गोपाल बिसेन , मनिष नंदेश्वर , प्रवेश डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या