पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचा प्रचारा ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Spontaneous response of citizens to the campaign of tourist friend Chandrapal Chokse
रामटेक विधानसभा क्षेत्रात एकच गुंज "चंद्रपाल चौकसे आऐंगे , रोजगार दिलाएंगे"
रामटेक विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासा साठी संधी गमावु नका - चंद्रपाल चौकसे
प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटना लोकजागृती मोर्चाचा चंद्रपाल चौकसे यांना जाहिर पाठिंबा
कन्हान : - वंचित बहुजन आघाड़ी समर्थनात रामटेक विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचा प्रचारा ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन ठिकठिकाणी चंद्रपाल चौकसे यांचे आरती ओवाळुन स्वागत केले जात आहे .
मागील अनेक वर्षा पासुन रामटेक विधानसभा क्षेत्र विकास पासुन दुर आहे . जन सामान्य नागरिकांचे प्रश्न , रोजगाराचे , आरोग्याचे प्रश्न आमदार , खासदार यांनी सोडुन नागरिकांना दिलासा दिला नाही . तर दुसरी कडे विरोधकांनी आंदोलन ची भुमिका घेतली नाही . त्यामुळे मतदारांनी या निवडणुकी मध्ये पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांना चांगला प्रतिसाद देऊन निवडुन आणायचे ठरविले असे बघायला मिळत आहे . रामटेक विधानसभा क्षेत्रात विकास कामाचे अनेक संधी आहे . आदिवासी सह अन्य भागात रोजगारा च्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आव्हाहन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले .
चंद्रपाल चौकसे यांनी अनेक गावांचा दौरा करुन पदयात्रा करित तरुण , तरुणी , शेतकरी , महिलांनी संवाद साधत विकासाचा वचननामा सादर केला . कुंवारा भिवसेन देवस्थानात जाऊन परमेश्वराचे दर्शन घेतले . सध्या रामटेक विधानसभा क्षेत्रात "चंद्रपाल चौकसे आऐंगे , रोजगार दिलाएंगे" अशी गुंज बघायला मिळत आहे . प्रचार दौऱ्यात महिला , तरुत , तरुणी , शेतकरी आणि नागरिक चंद्रपाल चौकसे यांना सहकार्य करीत आहे .
प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटना लोकजागृती मोर्चाचा चंद्रपाल चौकसे यांना जाहीर पाठिंबा
प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटना लोकजागृती मोर्चा ने वंचित बहुजन आघाड़ी समर्थनात रामटेक विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे . मोर्चाचे अध्यक्ष ॲड.रमण सेनाड , सचिव ॲड.राजेंद्र गिल्लूरकर , उपाध्यक्ष डॉ.दिलीप वैरागडे , संजय काळे ,भाऊ भोयर , मिलिंद चव्हाण ,रामटेक क्षेत्राच्या अध्यक्षा कामिनीताई हटवार यांनी गुरुवार (दि.१४)नोव्हेंबर ला रामधाम येथील चौकसे यांच्या कार्यालयात पाठिंब्याचे पत्र दिले . या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानंतर आता लोकजागृती मोर्चाच्या पाठिंब्याने चंद्रपाल चौकसे यांचे विधानसभा निवडणुकीत पारडे जड झाले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या