कन्हान नदी काठावर चार दिवसीय छठ पूजा महोत्सव थाटात
महिला आणि भाविकांनी केली पूजा अर्चना , उगवत्या सुर्याला केले जल अर्पण
कन्हान - उत्तर भारतातीय नागरिकांचा साजरा केला जाणारा सण छठ पुजा महोत्सव कन्हान येथे नदी काठावर महिला आणि भाविकांनी सलग चार दिवस विधिवत पूजा अर्चना आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करुन थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.५ नोव्हेंबर) ला नहे खाय चा पहिला दिवशी उपवास करण्यापूर्वी महिला आणि भाविकांनी नदीत आंघोळ करुन विधिवत पूजा अर्चना करुन छट पूजा महोत्सवाचा शुभारंभ केला . दुसऱ्या दिवशी खरना या दिवशी महिला आणि भाविकांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला . संध्याकाळी सूर्यास्ता नंतर उपवास सोडुन अन्न तयार करुन सूर्याला नैवेद्य अर्पण केले.
छठ पूजेच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी महिला आणि भाविकांनी नदीच्या काठावर बांबूच्या टोपल्यांमध्ये फळे , थेकुआ , तांदळाच्या , लाडूंसह सूर्यदेवाला अर्घ्य दिला उपवास नंतर कुटुंबासह सूर्य देवाला अर्घ्य देऊन मावळत्या सूर्याची पूजा अर्चना केली . चौथ्या दिवशी महिला आणि भाविकांनी उगवत्या सूर्याला अर्ध्य चे जल अर्पण करुन छठ पुजा महोत्सवाची सांगता करण्यात आली.
छट पूजा महोत्सव निमित्त कन्हान-पिपरी नगरपरिषद व नगर पंचायत कांद्री प्रशासना कडून वीज , पार्किंग आदींची व्यवस्था करण्यात आली . यावेळी विविध राजकीय संघटनां कडून खाद्यपदार्थ , फळे, शरबत आदींचे वाटप करण्यात आले. नदीकाठावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कन्हान नदी काठावर चार दिवसीय छठ पूजा महोत्सव थाटात | A four-day Chhath Puja festival takes place on the banks of Kanhan River.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या