कामठीत दोन भीषण अपघातात दोन महिला आणि एक तरुणाचा मृत्यु
पाच महिला सह दोन तरुण गंभीर जख्मी , पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : - कामठी शहरातील गरुड चौकात आणि खैरी शिवारात झालेल्या भीषण अपघातात दोन महिला सह एक तरुणाचा मृत्यु झाल्याने कामठी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार काल मंगळवार (दि.२६) नोव्हेंबर ला सकाळी पहाटे ४:३० वाजता च्या दरम्यान मृतक रोशन निलांबर नायक (वय २६) रा.कामठी हा चारचाकी वाहना ने दोन साथीदारा सह डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल विमानतळावर ड्यूटी वर जात होता . रोशन वाहन चालवत असतांना त्याचे वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या़ कडेला लावलेल्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने रोशन नायक याचा घटनास्ळीच मृत्यु झाला . सदर घटनेची माहिती कामठी पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतक रोशन नायक ला शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले असुन जख्मी दोन तरुणांचा उपचार खाजखी रुग्णालयात सुरु आहे .
खैरी शिवारातील नागपुर जबलपुर मार्गावरील उन्नती मोटर्स नवीन पुलाजवळ सायंकाळी ५ वाजता च्या दरम्यान आॅटो चालकाने मार्गावर उभ्या असलेल्या क्रेनवर जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात निर्मला जुमडे (वय ५०) रा.पाचपावली आणि कौशल्या जुडीकर (वय ६०) रा.शांतीनगर या दोन महिलांचा मृत्यु झाला .६ महिला नागपुर येथील भालाभाऊ पेठ कमाल चौक येथुन लग्न समारंभात काम करण्याकरिता जात होते . आॅटोत सहा महिला सह एक आॅटो चालक असे सात जन प्रवास करीत असतांना आॅटो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन मार्गावर उभ्या असलेल्या क्रेनवर जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यु झाला . घटनेची माहिती कामठी पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतक दोन महिले ला शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले असुन चार महिला सह आॅटो चालका चा खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे . या दोन्ही अपघात प्रकरणी कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास कामठी पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या