रामटेक विधानसभा घमासान २०२४ | राजेंद्र मुळक यांचा अपक्ष उमेदवारामुळे विशाल बरबटे अडचणीत
चौकसे , जयस्वाल , मुळक , बरबटे यांचात बहुरंगी लढत होण्याची शक्यता
कन्हान : - रामटेक विधानसभा निवडणुकीत काॅग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडी चे शिवसेना उद्धव गुट पक्षाचे उमेदवार विशाल बरबटे अडचणीत आले आहे . शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वारंवार विनंती आणि चर्चा बैठक करुन ही मतदार संघ काॅग्रेस ला न सोडल्याने विशाल बरबटे यांची डोकेदुखी वाढली आहे .
राजेंद्र मुळक यांचा मुळे महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांची देखील अडचण वाढली आहे . पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , सचिन किरपान हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत . उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रक्रिये नंतर विधानसभेचे रणांगण स्पष्ट झाले आहे . भाजप ला बंडखोरांना थांबविण्यात यश आले असुन तर काॅग्रेस ला बंडखोरांना थांबविण्यात अपयश आले . त्यामुळे काॅग्रेस ला मोठे मतविभाजन होईल असे स्पष्ट चित्र दिसुन येत आहे . आशिष जयस्वाल , राजेंद्र मुळक , चंद्रपाल चौकसे , विशाल बरबटे यांना आता प्रचार पुढे जाऊन मैदान मारण्याची कसोटी सर्वान समोर आहे . त्यामुळे रामटेक विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे . अशी नागरिकांन मध्ये चर्चा असुन या कडे मतदारांचे लक्ष लागले आहे .
राजेंद्र मुळक यांचा अपक्ष उमेदवारामुळे विशाल बरबटे अडचणीत | Rajendra Mulak's independent candidate Vishal Barbate in trouble
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या