Advertisement

रामटेक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजेंद्र बावनकुळे "डार्क हार्स" | Rajendra Bawankule "Dark Horse" in Ramtek Assembly Elections


रामटेक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजेंद्र बावनकुळे "डार्क हार्स"


महाविकास आघाडी च्या मतांची विभागणी होणार , तर भाजप मध्ये अंतर्गत गडबजी भोवणार ?


महायुती चे उमेदवार ॲड.आशिष जयस्वाल व राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्यात खरी लढत


कन्हान : - रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे विशाल बरबटे तर महायुती तर्फे शिंदे गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यात प्रमुख लढत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी समाजातील समीकरणात "एक ना धड , भारा भर चिंध्या" असा प्रकार दिसत आहे . त्यामुळे आदिवासी समाज व तेली समाज यांचे मत बहुतांश बघता राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे अधिकृत उमेदवार शाहीर राजेंद्र भिमराव बावनकुळे हे "डार्क हार्स ठरतील असे राजकीय समीसकांचे मत आहे . प्रमुख राजकीय पक्षांनी समाजिक समीकरण लक्षात न घेता उमेदवारी दिलेल्या आहेत . महायुती तर्फे शिंदे गटाचे ॲड.आशिष जयस्वाल यांना उमेदवारी मिळाली आहे . ते मागील चार टर्मचे आमदार आहेत . त्यांचे बहुबलय बघता महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उद्धव गटाचे विशाल बरबडे यांना उमेदवारी जाहीर केली . मात्र सक्रिय राजकारणात इतिहास बघता ते डमी उमेदवार असल्याचे बोलले जात आहे . ॲड.आशिष जयस्वाल यांच्या विरुद्ध अँटी इन्कबंरसी (नाराजी)आहे . हे नाकारता येत नाही.


रामटेक विधानसभा क्षेत्रात तेली समाजाची लोकसंख्या अधिक आहे . प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस असो किंवा भाजप , शिवसेना सर्वांनीच त्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे . बोटावर मोजण्या इतपत समाजातील लोकांना फायदा मिळाला . परंतु बहुसंख्याच्या राजकीय अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत . एकेकाळी रामटेक मध्ये मधुकर किमतकर , पांडुरंग हजारे यांच्या सारखे समाजाचे नेत्यांनी समाजाचे नेतृत्व केले . परंतु राजकीय समीकरण बदलल्या नंतर समाजाच्या अपेक्षांना सक्षम नेतृत्व मिळाले नाही . 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र बघता महायुतीचे उमेदवार ॲड.आशिष जैस्वाल महाविकास आघाडी चे उमेदवार विशाल भरवटे मैदानात आहेत . मात्र महाविकास आघाड़ी ने कमजोर उमेदवार दिला असा आरोप करीत काँग्रेस चे बंडखोर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली . त्यामुळे सध्या स्थितीत महायुती विरुद्ध अपक्ष राजेंद्र मुळक असा सामना दिसत असला तरी सामाजिक समीकरण चांगल्या रीत्याने बसत नाही . शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी राष्ट्रीय गोंडवाना पक्षा तर्फे उमेदवारी दाखल केल्याने तसेच भाजपचे माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी नाराज असल्याने ॲड.जयस्वाल यांना घाम फुटला आहे . 


दुसरीकडे चंद्रशेखर नामदे भीमटे - बहुजन समाज पाटी , विशेष वसंता फुटाणे - बहुजन सोशालिस्ट रिपब्लीकन पाटी , चंद्रपाल नब्दुसाव चौकसे - अपक्ष , विजय नत्थूजी हटवार - अपक्ष , सचिन मारोतराव किरपान - अपक्ष आदी लहान मोठ्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे महाविकास आघाडी च्या मत विभाजणीचा फटका बसताना दिसत आहे . अशात मोठ्या संख्येने मतदार असलेल्या तेली समाजाचे प्रतिनिधित्व करीत असलेले शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या पाठीशी आदिवासी समाज पूर्णपणे एकवटलेला आहे . शिवाय लोकशाहीर असल्याने राजेंद्र बावनकुळे यांनी शाहिरांच्या मानधनाची मोठा यशस्वी लढा दिल्याने त्यांना शाहीर समाजाच्या पाठिंबा आहे . अशा महाविकास आघाड़ी व अपक्ष राजेंद्र मुळक यांच्या मत विभागणीच्या राजकारणात विद्यमान ॲड.आशिष जयस्वाल व  राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्यात खरी लढत होईल असे दिसते . त्यामुळे शाहीर राजेंद्र बावनकुळेना रामटेक विधानसभेतील गटागटाच्या व राजकीय बंडाळीचा फायदा होईल किंवा ते "डार्क हार्स" ठरतील असे राजकीय समीसकांचे मत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या