कन्हान शहराचे युवा उद्योजक ज्ञानेश्वर दारोडे यांना मिक्युन बिजनेस एक्सलेन्स अवाॅर्ड
कन्हान : - कन्हान शहरातील युवा उद्योजक ज्ञानेश्वर दारोडे यांना मिक्युन बिजनेस एक्सलेन्स अवाॅर्ड जाहीर झाला असुन नागपुर शहरात आयोजित कार्यक्रमात त्यांना हा अवाॅर्ड प्रदान करण्यात आला .
प्रसिद्ध अभिनेता अमन वर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वर दारोडे यांनी सपत्नीक हा अवाॅर्ड स्वीकारला . स्मृतिचिन्ह आणि सम्मानपत्र असे या अवाॅर्ड चे स्वरूप आहे . कन्हान शहर व परिसरात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे . ही तरुण मंडळी रोजगाराच्या शोधात शहरांकडे भटकंती करतात .
ज्ञानेश्वर दारोडे यांनी कन्हान शहरात रोजगार उभारुन काही स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला . त्यांचा या कार्याची सकारात्मक दखल घेत त्यांना मिक्युन बिजनेस एक्सलेन्स अवाॅर्ड प्रदान करुन सम्मानित करण्यात आले . स्वतंत्र उद्योग सुरु करण्याची प्रेरणा आपण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कडुन घेतल्याची प्रतिक्रिया उद्योजक ज्ञानेश्वर दारोडे यांनी व्यक्त केली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या