कन्हान येथे दिंडी यात्रा काढुन कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी |
भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केली पुजा अर्चना , दिंडी यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
कन्हान : - कन्हान शहरातील शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्य नागरिकांनी विधिवत पुजा अर्चना करून दिंडी यात्रा परिसरात भ्रमण करित विविध कार्यक्रमाने कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.१२) नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी निमित्य छत्रपती शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जेष्ठ नागरिक मुलचंद शिंदेकर , जयरामजी तिडके , भरत सावळे , रवि सिंग सोलंकी यांचा सह महिलांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये विठ्ठल रुक्मिणी देवीची विधिवत पुजा अर्चना , आरती करून मंदिर पासुन दिंडी यात्रा काढण्यात आली .
दिंडी यात्रेत भगवानजी कावळे यांनी ढोलक आणि महिलांनी ताळ वाजवत दिंडी यात्रा परिसरात नगर भ्रमण करून दिंडी यात्रेचे मंदिरात समापन करण्यात आले . यावेळी दिंडी यात्रेचे ठिकठिकाणी फुलांच्या वर्षाने भाविकांनी जोरदार स्वागत केले . विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फराळ , चाहा, पाणी वितरण करण्यात आले . महिलांनी मंदिरात भजन कीर्तन , आरती आणि विविध कार्यक्रम सादर करून कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी अनुराग महल्ले , कृणाल सिंग तिलवार , वामन येवले , देवचंद टिक्कम , भगवान कावळे , विनायक भिलकर , दिपक लाहोरी , हरीष तिडके , छोटु राणे , पवन टिक्कम , प्रदीप गायकवाड , शुभम येवले तडस काकाजी सह आदि महिला आणि भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या