सुगाव येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लेंडी पूजन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा
लेंडी पुजनास ग्रामस्थांची मनोभावे व निःसार्थ साथ
मुखेड:- महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची पालखी क्र. 12 मुखेड तालुक्यातील मौजे सुगाव कॅम्प येथे ऐन दिवाळी काळात दाखल झालीय त्यामुळं भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पालखी दाखल होताच हजारो भक्तगण आपली उपस्थिती सुगाव येथे दर्शविली आहे. दीपावली व पाडवा या दिवशी बाळूमामा नी लेंडी पूजन व बकरी बुजवणे जो कार्यक्रम सुरू केला होता, तोच कार्यक्रम व तीच परंपरा कायम राखण्यासाठी आज सुगाव नगरीत मोठ्या जल्लोषात व हजारो भाविकांच्या उस्थितीत हा लेंडी पूजन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी मनोभावे व निःसार्थ साथ दिली आहे.
दरम्यान मामांच्या समाधी पश्चात श्रीक्षेत्र आदमापूर येथे गुढीपाडव्याला होणारा भंडारा उत्सव.. सप्टेंबरमध्ये होणारा पुण्यतिथी उत्सव…. ऑक्टोबरमध्ये होणारा मामांचा जन्मकाळ सोहळा आणि दीपावली पाडव्याला होणारे लेंडी पूजन हे चार मोठे धार्मिक उत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होतात. याशिवाय दर अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक मामांच्या दर्शनासाठी येत असतात, येणाऱ्या सर्व भाविकांना समिती मार्फत व अन्नदात्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन केलं जाते. या महाप्रसादाचे आस्वाद घेण्यासाठी हजारो - लाखो भाविक मामाच्या दरबारात येत असतात. तोच नजरा आज मुखेड तालुक्यातील मौजे सुगाव कॅम्प येथे पाहायला मिळाला आहे.
यावेळी तालुक्यातील व परिसरातील सर्वच बाळूमामा भक्तांनी त्याची दिवाळी मामाच्या दरबारात साजरी केली आहे... हे भाग्य सुगाव नगरीच्या पश्चात मिळाल्याने ग्रामस्थ अतिशय उत्साहित दिवाळी साजरी केली आहे.
यावेळी पालखीचे कारभारी यशवंत भाऊ बनवसकर यांनी सर्व सेवेकरी व भक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला आहे.
पुढाकार २४तास सोबत सह संपादक प्रशांत पवित्रे मुखेड नांदेड
0 टिप्पण्या