कांद्रीत भव्य रक्तदान शिबीर थाटात, १२५ नागरिकांनी केले रक्तदान
कन्हान : - कांद्री येथे युनियन बैंक जवळ सिन्नु अन्ना यांचा स्मृति दिवस आणि राजन विनयवार यांचा वाढदिवस निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . रविवार (दि.३) नोव्हेंबर रोजी हैप्पी टु केयर फाउंडेशन चे संचालक मनीष आगलावे , मयुर काळे , मुसाब अंसारी , स्वप्निल शर्मा यांचा द्वारे आयोजित रक्तदान शिबीरात एकुण १२५ नागरिकांनी रक्तदान केले .
या शिबीर कार्यक्रमात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे , राजेंद्र मुळक , नरेश बर्बे आदि मान्यवरांनी भेट देऊन सिन्नु अन्ना यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन केले आणि राजन विनयवार यांना भेट वस्तु देऊन वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजे फाॅऊंडेशन , विदर्भ लोकल ट्रक असोसिएशन , लाईक लाईन ब्लक बैंक सह आदिंनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या