Advertisement

रामटेक विधानसभा निवडणुकीत चंद्रपाल चौकसे यांचा चुनाव चिन्ह टाँर्च | Election symbol of Chandrapal Chokse in Ramtek assembly elections


रामटेक विधानसभा निवडणुकीत चंद्रपाल चौकसे यांचा चुनाव चिन्ह टाँर्च


जोडप्यांचे शुभंगल, महिलांन करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन केले

युवक आणि युवतींना थेट नियुक्ती पत्र देऊन रोजगार मिळवुन दिले

कन्हान  - रामटेक विधानसभा अंतर्गत मनसन येथील रामधाम पर्यटक मित्र मा.चंद्रपाल चौकस यांना विधानसभा निवडणुकीत टाँर्च चिन्ह मिळाले आहे.
पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी आपल्या चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान चा माध्यमातुन जोडप्यांचे शुभंगल लाऊन दिले. महिलांन करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दिला. महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत रामधाम येथे ब्रायडल मेकअप चे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले.
रोजगार महोत्सवात बेरोजगार तरुण युवक आणि युवतींना थेट नियुक्ती पत्र देऊन रोजगार मिळवुन दिले. शहरी आणि ग्रामीण भागात फिरुन जन सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकुण शासना समोर मांडले, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. प्रतिष्ठान च्या माध्यमातुन नागरिकांन पर्यंत शासनाच्या योजने ची माहिती पोहोचवली असे अनेक विविध प्रकारचे सामाजिक कार्य चंद्रपाल चौकसे यांनी केले.
 
मंगळवार (दि.२९) आॅक्टोंबर ला चंद्रपाल चौकसे यांनी हजारो पेक्षा अधिक लोकांचा प्रमुख उपस्थिती मध्ये जल्लोषात भव्य मिरवणुक काढुन निवडणुक निर्णय अधिकारी रामटेक यांचा कडे नामांकन दाखल केले होते.
सोमवार (दि.४) नोव्हेंबर ला चिन्हवाटपात निवडणुक निर्णय अधिकारी रामटेक यांनी चंद्रपाल चौकसे यांना टाँर्च चिन्ह दिले. चंद्रपाल चोकसे हे रामटेक विधानसभा क्षेत्रातील अंधार दुर करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची मुख्य लढत ही महायुतीचे आशिष जयस्वाल व शिवसेना उबाठा गटाचे विशाल बरबटे यांचा सोबत आहे.रामटेक विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलीच टक्कर होणार असुन  आशिष जयस्वाल रामटेक गड कायम ठेऊ शकणार काय या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रामटेक विधानसभा निवडणुकीत चंद्रपाल चौकसे यांचा चुनाव चिन्ह टाँर्च | Election symbol of Chandrapal Chokse in Ramtek assembly elections
 
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या