अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचारा ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Citizens' spontaneous response to the campaign of independent candidate Rajendra Mulak
काॅंग्रेस च्या जेष्ठ नेत्यासंह महाविकास आघाडी चा आणि महायुती चा सहकार्य मिळत आहे - राजेंद्र मुळक
कन्हान : - रामटेक विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलतांना एका व्यक्तवान राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . मला काॅंग्रेस च्या जेष्ठ नेत्यासंह महाविकास आघाडी घटक पक्षाचा पाठिंबा मिळत असुन भाजपा सह शिवसेना शिंदे गटा कडुन देखील समर्थन सहकार्य मिळत आहे असे राजेंद्र मुळक यांनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे .
सध्या निवडणुकीचा जोर चांगला वाढला असुन प्रचार अंतिम टप्यात पोहचला आहे . केवळ राजकीय पक्ष नव्हे तर अपक्ष उमेदवारांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे . यातच रामटेक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांनी मतदार संघातील अनेक गावात प्रचार केला असुन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे .
तसेच राजेंद्र मुळक यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपुर जिल्हा ग्रामीण , गोंडवाना गणतंत्र पार्टी सह आदि अनेक सामाजिक संघटनानी समर्थन दिल्याने निवडणुकीत राजेंद्र मुळक यांचे पारडे जड झाले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या