रामटेक विधानसभेच्या उम्मेदवार ला आव्हान | Challenge to Ramtek Assembly candidate
रामटेक विधानसभेचा निवळणुकी मध्ये उभे असलेल्या सर्व सन्मानीय उम्मेदवारांना मतदार संघातील मतदाता कडून आव्हान करतो की आम्ही दिलेल्या विषयावर तुमची भूमिका स्पष्ट करावी.
तसेच सर्व मतदार भाऊ बहिणींनो, मित्रांनो आम्ही तुमचा समोर ठेवलेल्या विषयावर तुमचे काही म्हणणे असलं तर तुम्ही आम्हांला सांगावे ही नम्र विनंती.
आपला
संजय सत्येकार
कन्हान, नागपूर
रामटेक विधानसभा श्रेत्र.
9270086396
-: रामटेक परिसरात स्टील प्लांट सुरु करने :-
मनसर - साटक मोठया प्रमाणात मॉईलच्या मैगनीज खदानी आहे. इथे मैगनीज निघणाऱ्या वर इथेच प्रक्रिया उधोग(स्टील प्लांट)सुरु करावा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्या.
-: रामटेक परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करने :-
रामटेक शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या महादुला, शिवनी भोनकी, किरणापूर,मुसेवाडी असे 30-40 गावांच्या कोरडंवाहू शेतकऱ्यांचा शेती साठी पेच व खिंडसी धरणाचे चे पाणी पोहचवणे.
-: विधार्थी साठी ST बस ची संख्या वाढवावी :-
रामटेक, मौदा, पारशिवनी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी रामटेक डेपो मध्ये बस ची संख्या वाढवणे.
-: मेट्रो ट्रेन ला कन्हान -कांद्री -टेकाडी फाट्या पर्यंत विस्तारित करा :-
कन्हान नदी आडवा पुल(कामठी)पर्यंत होत असलेली मेट्रो ट्रेन ला कन्हान -कांद्री -टेकाडी फाट्या पर्यंत विस्तारित करणे.
-: खंडेलवाल कंपनी ची खाली जागा ताब्यात घेऊन नवीन उधोग सुरु करा :-
कन्हान परिसरात मोठा उद्योग सुरु करणे. (त्या साठी खंडेलवाल कंपनी ची खाली जागा कामात येऊ सकते.कंपनी जागा विकण्यात इच्छुक असल्याची सूचना आहे )
-: नांदगाव -बखारी इथे नवीन पॉवर हाऊस बनवा :-
कोळसा खान तिथेच पॉवर हाऊस व स्थानिक लोकांना व प्रकल्प ग्रस्थांना रोजगार धंद्याची प्राथमिकता या उद्देशासाठी कन्हान जवळील कोळसा खान परिसरातील नांदगाव बखारी इथे MSEB ची 700=800 एकर शेत जमिन पडीत आहे. या जमीन वर नवीन पॉवर हाऊस उभे करणे.
-: लोक संख्या दीड लाख आणि दवाखाना PHC :-
कन्हान येथील PHC दवाखान्याला उपजिल्हा रुग्णालय करणे.
-: पारशिवणी भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठया उधोगाची गरज :-
पारशीवणी भागात हजारो तरुणांची फोज तयार झाली आहे. या करीता मोठे उधोग उभारून येथील लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून ध्यावे.
-: पारशिवणी भागात पर्यटन उधोगाला मोठी संधी आहे :-
पेच धरण परिसरात 20-25 वर्षा पासून बंद असलेल्या गार्डन पर्यटन केंद्राचे पूनर उभारनी करणे.
-: पवनी - देवलापार उधोग आणि तहसील ची गरज :-
पवनी - देवलापार भागातील स्थानिक बेरोजगार लोकांसाठी पर्यावरण पूरक मोठा उद्योग सुरु करणे आणि पुर्ण दर्जाचे सर्व विभाग कार्यालय असलेले तहसील करावी.
-: पवनी - देवलापार भागात शेतीला पाणी आणि जनावर पासून पिकाची सुरक्षा :-
पवनी-देवलापार भागात कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करने आणि जंगली जनावरा पासून पिकाचा सुरक्षितेसाठी कंपाउंड ची व्यवस्था करणे.
-: कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विषय
MSP आहे :-
मध्यम स्टेपल कापूस: ₹७,१२१,
लांब स्टेपल कापूस: ₹७,५२१ प्रति क्विंटल आणि
सध्या खरीदी विक्री सुरु आहे 6000 ते 6500 रुपये या वर भूमिका स्पष्ट करावे.
-: धान उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविणे :-
धान उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून काही राईस मिल व व्यापारांकडून होत लुबाळणूक थांबवण्यासाठी दीर्घ कालिन योजना बनविणे.
-: पवनी - देवलापार भागात अपुऱ्या असलेल्या शिक्षणाची सोय करने :-
पवनी - देवलापार भागात अपुऱ्या शिक्षण व्यवस्थेसाठी 10 वी नंतर पुढील शिक्षणासाठी अनुदानित 11-12 सायन्स कॉलेज, बी ए, बी कॉम,बी एस सी डिग्री कॉलेज, आय टी आय, पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज , व मेडिकल कॉलेज सर्व सरकारी अनुदानित सुरु करणे.
-: निमखेडा-तारसा गावाचा मधात असलेली 179 एकर शेत जमिनी बाबद :-
निमखेडा-तारसा या भागात कृषी विद्यापीठाकडून 179 एकर जागा शेतकऱ्यांकडून घेऊन ठेवलेली आहे. ही शेती अनुपयोगी पडलेली आहे.ही जागा मिरची पिकासाठी संशोधन केंद्र आणि इतर पिकासाठी कोल्डस्टोरेज, पॅक हाऊस, प्रशिक्षण केंद्र इत्यादी कामासाठी शासनाने तात्काळ उपयोगात आणावी .
*
-: शेत पांधन रस्ता डांबरीकरण करने :-
प्रत्येक शेतात 12 महिने जा - ये करण्यासाठी रामटेक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक शेताला जाणाऱ्या, जोडणाऱ्या पांधण रस्त्याचे शंभर टक्के डांबरीकरणं करावे.*
[
-: कन्हान रेल्वे जंक्शन वर एक्सप्रेस चे स्टोपेज सुरु करने :-
कन्हान रेल्वे जंक्शन स्टेशन वर महाराष्ट्र एक्सप्रेस व इतर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे स्टोपेज सुरु करणे.
-: रामटेक ते बुटीबोरी MIDC लोकल ट्रेन :-
रामटेक वरून इतवारी रेल्वे स्टेशन पर्यंत चालणारी लोकल ट्रेन चा विस्तार करून बुट्टीबोरी MIDC पर्यंत चालू करने.
-: रामटेक - शेगाव ट्रेन सुरु करने :-
रामटेक तीर्थस्थळा वरून शेगांव तीर्थस्थळा पर्यंत चालणारी नवीन ट्रेन गजानन महाराज नावाने ट्रेन सुरु करने .
-: दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा रेल्वे मार्ग :-
नागपूर-कन्हान-रामटेक-देवलापार शिवनी जबलपूर-इलाहबाद-वाराणसी या अति महत्वकांशी रेल्वे उपक्रमातील रामटेक ते शिवनी रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी काम सुरु करणे.
-: विचारधीन असलेला नवीन रेल्वे मार्ग :-
तुमसर, रामटेक, पारशिवणी, सावनेर, काटोल, नरखेड, अमरावती (पुढे दिल्ली, मुंबई कडे )रेल्वे मार्गाच्या प्रस्तावावर काम सुरु करावे.
-: धार्मिक - अध्यात्मिक टुरिझम सर्कल डेव्हलोपमेंट :-
अयोध्या, वाराणसी, प्रयागराज (इलाहबाद) रामटेक तसेच बुद्धगया, नागार्जुन टेकडी (मनसर),बुद्धिष्ट फ्युचरल पार्क(सिहोरा, कन्हान) ड्रॅगन पॅलेस(कामठी )दीक्षाभूमी (नागपूर)असा धार्मिक टुरिझम सर्कल डेव्हलोपमेंट आराखडा तयार करणे.
-: रामटेक -मुंबई एक्सप्रेस सुरु करून महान त्यागी बाबा जुमदेवजी नाव ध्यावे :-
नागपूर वरून सुटणारी मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस रामटेक पासून सुरु करावी. किंवा रामटेक -मुंबई नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु करून तीला महान त्यागी बाबा जुमदेवजी नाव ध्यावे.
-: मांग-गारोडी समाजाच्या उत्थानासाठी आराखडा तयार करा :-
कन्हान नगर परिषद क्षेत्रात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा असलेला मांग-गारोडी समाजाच्या उत्थानासाठी शासनाचा स्थरावर आराखडा तयार करून योजना लागू करण्या बाबत
रोजगार, स्वयं रोजगार, शिक्षण, घरकुल, इतर बाबी साठी आर्थिक तरतूट करणे
-: ढिवर आणि आदिवासी :-
रामटेक विधानसभा श्रेत्रात ढिवर समाज आणि आदिवासी समाज मोठ्याप्रमाणात आहे. यांचा आर्थिक, रोजगाराची, सामाजिक, शैक्षणिक समस्याचा दूर करण्यासाठी आराखडा तयार करून समाधान शोधणे.
0 टिप्पण्या