Advertisement

महायुती चे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा विजयाचा कन्हान येथे जल्लोष | Celebrations in Kanhan for the victory of Mahayuti candidate Ashish Jaiswal


महायुती चे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा विजयाचा कन्हान येथे जल्लोष | 
Celebrations in Kanhan for the victory of Mahayuti candidate Ashish Jaiswal


आतिशबाजी, गुलाल उधळुन, विजय मिरवणुक काढुन जल्लोष साजरा


भाजपा - शिवसेना महायुतीचा विजय असो अश्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले


आशिष जयस्वाल यांनी लाडक्या बहीणींचे आणि मतदारांचे आभार मानले



कन्हान - रामटेक विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार अॅड. आशिष जयस्वाल यांचा दणदणीत विजय झाल्याने कन्हान येथे महायुति च्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिबाजी करुन विजय मिरवणुक काढुन विजय जल्लोष साजरा केला.



अॅड. आशिष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना २६, ७१४ मतांनी पराभुत करुन पाचव्यांदा विजय मिळवुन इतिहास रचला. बुधवार २० नोव्हेंबर ला रामटेक विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ७१.८० टक्के मतदान झाले होते. वाढता मतदानाचा टक्का कोणाचा बाजुने लागतो या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवार २३ नोव्हेंबर ला कवि कुलगुरु संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे सकाळी ८ वाजता पासुन मतमोजणीला सुरवात झाली.
पहिल्या फेरी पासुन अठराव्या फेरी पर्यंत आशिष जयस्वाल यांना आघाडी मिळाल्याने त्यांनी १, ०७, ४१४ मते घेऊन अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना २६, ७१४ मतांनी पराभुत करुन विजय मिळला. निवडणुक अधिकारी प्रियेष महाजन यांनी आशिष जयस्वाल निवडुन आल्याची घोषणा केल्याने कन्हान येथे महायुति च्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिबाजी करुन, गुलाल उधळुन विजय मिरवणुक काढली.
 

आमदार आशिष जयस्वाल विजय मिरवणुकीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या पुष्पहाराने स्वागत केले. मिरवणुक तारसा चौक येथुन काढुन, सात नंबर नाका, गहुहिवरा चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक सह आदि विविध मार्गाने भ्रमण करुन मिरवणुकीचे आंबेडकर चौक येथे समापन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार आशिष जयस्वाल यांनी पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत, महायुति च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, लाडक्या बहीणींचे आणि मतदारांचे आभार व्यक्त केले.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या