सिहोरा गावात वाघाच्या हल्यात एका गाईचा मृत्यु , दुसरी गाय गंभीर जख्मी
वाघाचा धुमाकुळाने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी
कन्हान : - कन्हान - पिपरी नगरपरिषद अंतर्गत कन्हान नदी काठा लगत सिहोरा गावाजवळ भर दुपारी वाघाने हल्ला करून गोवणातील पांढऱ्या गाईला ठार केले असुन काळया गाईला गंभीर जख्मी केल्याने परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
काल सोमवार (दि.७) ऑक्टोंबर ला सकाळी सिहोरा शेत परिसरात वाघ आढळल्याची माहिती नागरिकांनी वन विभाग व पोलीस विभागाला दिल्याने प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले होते . काही काळच न जाताच काल दुपारी ३ वाजता च्या दरम्यान कन्हान नदी काठा लगत सिहोरा खंडेलवाल च्या मोकळया जागेतील झुडपी जंगलात गावाजवळ शंभर मिटर वर वाघाने हल्ला करून पशु मालक शांताराम भोंधु मेश्राम यांच्या
गोवणातील पांढऱ्या गाईला ठार केले असुन काळया गाईला गंभीर जख्मी केले . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांन मध्ये मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सदर घटनेची माहिती वनविभाग अधिकार्यांना मिळताच आरफओ ए.बी.भगत , वनपाल बी.डी. वरखडे , सिहोरा परिक्षेत्र वनरक्षक , सिहोरा वनरक्षक एन. के.मेश्राम , पटगोवरी वनरक्षक सतिश वासनिक , वनमजुर म्हैसुर भोंडेकर यांनी घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर भदाने यांनी मृत गाईचे शवविच्छेदन करून मातीत दफन केले . तर जख्मी गाईचे उपचार सुरू आहे .
सदर घटने नंतर घटनास्थळ परिसरात वनरक्षक वाढवुन ग्रस्त करित फटाके फोडुन वाघा पासुन नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यास सुरूवात करण्यात आली असुन सध्या दोन कँमेरे लावण्यात आले . वेळ व परिसरानुसार कँमरे वाढविण्यात येईल असे वन परिक्षेत्र अधिकारी ए. बी.भगत यांनी फोन वर सांगितले .
सिहोरा गावात वाघाच्या हल्यात एका गाईचा मृत्यु , दुसरी गाय गंभीर जख्मी | In Sihora village, one cow died in a tiger attack, another cow was seriously injured
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या