Advertisement

धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक | The accused who was carrying a sharp weapon was arrested


धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक | The accused who was carrying a sharp weapon was arrested

कन्हान पोलीस डीबी पथकाची कारवाई 

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव काॅलोनी मध्ये हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपी गोलु ऊर्फ फिंदु चौधरी ला डीबी पथकाने पकडुन  लाॅकपबंद केले .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.२८) आॅक्टोंबर ला दुपारी १२:०० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस डीबी पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि गोलु ऊर्फ फिंदु चौधरी हा गोंडेगाव काॅलोनी मध्ये हातात तलवार घेऊन फिरत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी गोलु ऊर्फ फिंदु चौधरी चा घरी जाऊन परिचय देऊन नाव विचारले असता त्याने आपले नाव रविप्रकाश ऊर्फ गोलु गुलाब चौधरी (वय ३२) रा.गोंडेगाव काॅलोनी असे सांगितले . 

पोलीसांनी सदर इसमाचा घरची झडती घेतली असता घराच्या आतील खोलीत लाकडी दिवाणाचा गादीखाली निळ्या रंगाच्या कव्हर मध्ये धारदार तलवार किंमत ८०० रु मिळुन आली . इसमाला शस्त्र बाळगणे बाबत परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी रविप्रकाश ऊर्फ गोलु गुलाब चौधरी ला अटक करुन त्याचा जवळुन तलवार जप्त करुन गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात पोना अमोल नागरे करीत आहे.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचा मार्गदर्शनात , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , सपोनि राहुल चव्हान , हरिष सोनभद्रे , महेश बिसेन , मपोहवा नालंदा पाटील , अमोल नागरे , अश्विन गजभिए , आकाश सिरशाट सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या