कन्हान नदी नवनिर्मित पुलाने घेतला चार लोकांचा बळ
नगर परिषद प्रशाशनाचे दुर्लक्षामुळे पथदिवे पडले बंद , कधी सुरु होणार ?
आणखी किती लोकांचा बळी घेणार , लोकप्रतिनिधी व अधिकारी
कन्हान : - कन्हान नदी नवनिर्मित पुला वरील पथदिवे कन्हान - पिपरी नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही दिवसांपासून बंद पडले आहे . यामुळे पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . या पुलावर आता पर्यंत अनेक अपघात झाले असुन चार लोकांचा बळी गेला आहे . अशा वेळी खासदार , आमदार , लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्गा चे अधिकारी आणखी किती लोकांचा बळीची वाट पाहत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कन्हान नदीवर ५०.६३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते . उद्घाटन होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला असुन या पुलावर खड्डे आणि पथदिवे बंद पडल्याची समस्या कायमची झाली आहे . या पुलावरुन बसेस, ट्रक , चारचाकी , बाराचाकी , दहाचाकी मोठ मोठे वाहन , फोर व्हीलर , टु व्हीलर असे शेकडो वाहने जाने येणे करतात .
त्यामुळे वाहन चालकांना बराच त्रास होत असुन पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . या पुलावरुन क्षेत्राचे खासदार , आमदार , लोकप्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी जात असल्यावर ही समस्या सूटत का नाही ? काय एखाद्या मोठा अपघातात लोकांचा बळीं जाण्याची वाट पाहत आहेत का ? असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे . कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाने , खासदार , आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर समस्या कडे लक्ष वेधुन पुलावरील बंद पडलेले पथदिवे सुरु करावे अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे .
कन्हान नदी नवनिर्मित पुलाने घेतला चार लोकांचा बळ | Kanhan river newly built bridge took the strength of four people
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या