मुरबाड मध्ये शिंदे गटाला मोठा धक्का
मुरबाड तालुक्यातील माझी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष गोटीराम पवार हे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व शिंदे गटाचे भिवंडी संपर्कप्रमुख होते, सुभाष पवार यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असून यामुळे मुरबाड मधून शिंदे घाटाला मोठाच मोठा धक्का म्हणावा लागेल.
भाजपाचे किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, मुरबाड मतदार संघात किसन कथोर यांना टक्कर देणार उमेदवार कोण अशी चर्चा अनेक दिवस रंगत होती या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला, भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांचा पराभव करत सुरेश म्हात्रे यांचा तुतारी तून विजय झाला होता, त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत तुतारीचे उमेदवार सुभाष पवार यांना अधिक फायदा होईल अशी चर्चा मुरबाड मतदार संघातून होत आहे.
मुरबाड मध्ये शिंदे गटाला मोठा धक्का | Big blow to Shinde group in Murbad
प्रतिनिधी- किरण कारभळ, मुरबा
0 टिप्पण्या