Advertisement

जिल्हा परिषदेच्या सभागृहाने मला ओळख दिली : रश्मी बर्वे | Zilla Parishad hall introduced me: Rashmi Barve


जिल्हा परिषदेच्या सभागृहाने मला ओळख दिली : रश्मी बर्वे  

रश्मी बर्वे यांनी स्वीकारला पदभार , जिल्हा परिषद सदस्यांकडून सत्कार 

नागपूर :  उच्च न्यायालयाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचे निकाल दिल्याने त्यांना आपले जिल्हा परिषद सदस्य पद बहाल करण्यात आले आहे . माजी मंत्री सुनील केदार , खासदार श्यामकूमार बर्वे यांनी जिल्हा परिषद येथे रश्मी बर्वे यांची भेट घेत अभिनंदन केले . तर जिल्हा परिषद सदस्यांकडून पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात नामांकन दाखल केल्यातनंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समिती कडून अवैध असल्याचे सांगून जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते . तर त्यांचे जिल्हा परिषद सदस्य पद ही रद्द करण्यात आले होते . 

सोबत त्यांचे लोकसभेचे नामांकन बाद ठरवत पक्षाने त्यांचे पती श्यामकूमार बर्वे यांना उमेदवारी दिलेली होती . सहा विधानसभा पिंजून काढत त्यांनी त्यांची विरोधकांनी कशी हिसकावून घेतली हा आपल्यावर झालेला अन्याय त्यांनी जनतेसमोर मांडून न्याय देण्याची मागणी केली प्रकरणी लोकसभा निवडणुकीचा निकाल श्यामकुमार बर्वे यांच्या बाजूने लागला होता . 

जनमताणे दिलेला कौल याच्यावर विरोधकांनी सहानुभूती असल्याचे ताशेरे ओढलेले असतांच नुकताच उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी संदर्भात ऐतिहासिक निकाल देत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल देत समितीवर एक लाखांचा दंड ठोठावून विरोधकांच्या तोंडाला पाण पुसण्याच काम केल . निकाला नंतर रश्मी बर्वे यांचे जिल्हा परिषद सदस्य पद देखील बहाल करण्यात आले होते .

सोमवार ला बर्वे या सर्वसाधारण सभेसाठी सभागृहात पोहचल्या जिथे माजी मंत्री सुनील केदार ,खासदार श्यामकुमार बर्वे , जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , उपाध्यक्ष कुंदा राऊत , सभापती महिला बालकल्याण अवंतिका लेकुरवाडे , शिक्षण सभापती राजू कुसुबे , मुख्य कार्यकारी अधिकारी , यांचे सह सत्ता पक्ष व विरोधी पक्ष नेते आतिश उमरे , जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या . 

यावेळी रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाने मला ओळख दिली सर्वसामान्य माणसांची प्रश्ने सोडविण्याचा मार्ग दिला या सभागृहाचे आजीवन ऋणी आहे अश्या शब्दात आपल्या भावना प्रगट करत संविधानाचे आभार मानले .

Zilla Parishad hall introduced me: Rashmi Barve

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या