रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासा करिता शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो . परंतु कोट्यावधी रुपयांचा नावांवर जनप्रतिनिधि आणि प्रशासकीय अधिकारी मिळुन विकास कार्यात भष्ट्राचार करत असल्याचा आरोप नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे . नाली , रस्ते बांधकामात दिरंगाई होत असल्याने कित्येका नागरिकांनी जिल्हाधिकारी , आमदार , खासदार यांना विकास कार्याचा कामाची चौकशी बाबत निवेदन देऊन भष्ट्र अधिकार्यांवर कारवाई ची मागणी केली .
रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास कधी होणार आणि कोण करणार ? | When and who will develop Ramtek Assembly Constituency?
महायुती आणि महाविकास आघाडी ची टिकट कोणाला मिळणार ?
अनेक समस्यामुळे नागरिक त्रस्त , बेरोजगारी चे प्रमाण वाढले
लाॅजेस , अवैध धंधे आणि गुन्हेगारी चे प्रमाण वाढले
कन्हान : - रामटेक विधानसभा क्षेत्र विकास कार्या पासुन वंचित आहे . राजकीय पक्षाचे नेते जनतेला खोटे आश्वासन देऊन निवडुन येतात , पण आज ही क्षेत्रात अनेक समस्या असल्याने
रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास कधी होणार आणि कोण करणार असा प्रश्न नागरिकांच्या डोळ्या समोर उभा झाला आहे.
परंतु आज पर्यंत कुठल्याही अधिकार्यांवर कारवाई झाली नाही . त्यामुळे क्षेत्रात जनतेच्या पैशाचा संविधानिक पदावर बसलेले आमदार , खासदार , नगराध्यक्ष , नगरसेवक आणि प्रशाकीय अधिकारी खेळ खेळत असल्याचे चित्र दिसुन येत आहे . सध्या चा परिस्थिति मध्ये शहरी व ग्रामीण भागात पाण्याचा समस्या , खराब रस्त्याची समस्या , दुकानदारांना स्थाई जागा नाही , अश्या अनेक विविध समस्या पासुन नागरिक त्रस्त आहे .
परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यावर ही राजकीय पक्षाचे नेते आंदोलन ची भुमिका घेतांना दिसुन येत नाही आहे . रामटेक विधानसभा क्षेत्रात बेरोजगारी , अवैध धंधे , लाॅजेस , गुन्हेगारी चे प्रमाण वाढल्याने येणाऱ्या काळात रामटेक विधानसभा क्षेत्रात गुंड्याचा राज निर्माण होणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .
येत्या दोन महिन्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे . महायुती आणि महाविकास आघाडी नेते रामटेक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा दौरा करुन नागरिकांशी चर्चा करत आहे .
तीन ते चार वर्ष राजकीय पक्षाचे नेते नागरिकांचा समस्या कडे कानाडोळा करतात आणि जसे जसे निवडणुका जवळ येतात तेव्हा जनतेत जाऊन राजकीय भाषेचा वापर करून गुमराह करतात . अश्या परिस्थिति मुळे रामटेक विधानसभा क्षेत्र विकास कार्या पासुन वंचित राहिला आहे असे जेष्ठ नागरिकांच्या चर्चेतुन बोलले जात आहे .
खऱ्या अर्थाने रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास होणे आणि जन सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटने खुप गरजेचे झाले आहे . त्यामुळे येणाऱ्या रामटेक विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी विचार करुन योग्य उम्मेदवाराला निवडुन अधिवेशनात पाठवावे असे जागृत नागरिकांन कडुन बोलले जात आहे .
रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास कधी होणार | कोण करणार | When and who will develop Ramtek Assembly Constituency |
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या