सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
कन्हान : - सार्वजनिक वाचनालय राजीव गांधी बालउद्यान परिसर हनुमान नगर कन्हान येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती आणि भारतरत्न स्व.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चव्हान आणि प्रमुख अतिथी गंगाधरराव अवचट सह आदि मान्यवरांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व उपस्थित सभासद व वाचकांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकरराव मस्के कोषाध्यक्ष यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले तसेच "जय जवान जय किसान" या लालबहादूर शास्त्री यांच्या नाऱ्या विषयी देशाला आजच्या घडीला किती आवश्यकता आहे याबाबत उपस्थितांना माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रमुख अतिथी स्वप्निल भिलावे कु.आचल बांगडे , सौ.दक्षिणा गाते यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनाविषयी तसेच कार्याविषयी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात आशिष घोरपडे , जसवंत ठाकूर , कृणाल कोल्हे , समर्थ ढोले , अंकित लाडेकर , कु आचल परतेती , कु कस्तुरी कोल्हे , अभिषेक निमजे , अनुज टिकले , अनिकेत दिवे , स्वप्निल बोरकर , कु युवानी कोल्हे , मयूर शेंडे इत्यादी सभासद व वाचक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन मनोहर कोल्हे सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले . आभार प्रदर्शनानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार आणि मिठाई वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या