मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटन राबवणार- शैलेश वडनेरे
मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, पाणी,आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि मी आमदार झालो तर मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटन राबवणार असे प्रतिपादन शैलेश
वडनेरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले, मुरबाड हि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भिमाईचे जन्म स्थान आहे. आज पर्यंत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील आंबेटेबें येथील भिमाई भुमीला भेट दिली नसून भीमअनुयायीनां उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.
असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) उमेदवार शैलेश वडनेरे यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर सर्वप्रथम भिमाई भुमीचा विकासाचा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही।
तसेच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्रात अनेक रस्ते झाले नाही,विज पुरवठा मध्ये चाललेला सावळा गोधळ,पाणी,रस्ते असे अनेक रखडले विकास काम पहिल्यांदा करणार असे बोलताना सांगितले
राजेश भांगे मुरबा, ठाणे
0 टिप्पण्या