धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलीसांनी पकडले
कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखा नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा बस स्टैंड आणि आंबेडकर चौक येथे धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलीसांनी पकडुन त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.१९) आॅक्टोंबर ला स्थानिक गुन्हे शाखा पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि बोरडा बस स्टैंड जवळ एक इसम धारदार चाकु हातात घेऊन धुमाकुळ घालत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी बोरडा बस स्टैंड जवळ पोहचुन पाहणी केली असता एक इसम संदिग्ध अवस्थेत मिळुन आला .
पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांनी आपले नाव विशाल नामदेव चिंचोळकर (वय ३६) रा.कन्हान असे सांगितल्याने पोलीसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता कमरेत चाकु मिळुन आला . पोलीसांनी आरोपी विशाल चिंचोळकर यास अटक करुन त्याचा विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे .
सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सपोनी किशोर शेरकी , मनोज गदादे , जीवन राजगुरु , सफौ विनोद काळे , पोहवा किशोर वानखेडे , प्रमोद भोयर , नारायण राठोड , पोना संजय बदोरिया , अमित मेहर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
घरातुन दोन चाकु जप्त , कन्हान पोलीसांची कारवाई
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.२१) आॅक्टोंबर ला दुपारी १२ वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि काल रात्री च्या दरम्यान धरम नगर पिपरी येथे राहणार इसम नामे रोहित बाबुलाल कांमळे हा आंबेडकर चौक येथे हातात चाकु घेऊन फिरत होता . सध्या तो आपल्या घरी असुन त्याने चाकु आपल्या घरी लपवुन ठेवला आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी सदर ठिकानी जाऊन रोहित च्या नावाने आवाज दिला असता एक इसम बाहेर आला .
त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव रोहित बाबुराव कांबळे (वय १८) रा.धरम नगर असे सांगितल्याने पोलीसांनी त्याचा घराची अवैध हथियारा बाबत झडती घेतली असता घराचे समोरील खोलीत भिंतीतील आलमारीत कपड्याखाली दोन चाकु मिळुन आले . रोहित ला शस्त्रा बाबत परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी रोहित कांबळे ला अटक करुन त्याचा विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे .
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , सपोनि राहुल चव्हान , पोहवा हरिष सोनभद्रे , पोना अमोल नागरे , अश्विन गजभिए , आकाश सिरसाट , म.पोहवा नालंदा पाटील सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या