विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कन्हान पोलीसांचा रुट मार्चनागरिकांशी संवाद साधुन पोलीसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश |
On the background of the assembly elections, the Kanhan Police route march communicated with the citizens and the police gave the message to vote fearlessly.
आचारसंहिता कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज - पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील
कन्हान : - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कन्हान पोलीस स्टेशन द्वारे शहरात शिस्तबध्दरितीने रुट मार्च काढण्यात आला असुन आचारसंहिता कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा रुट मार्च दरम्यान पोलीसांनी दिला आहे.
विधानसभा निवडणूक च्या अनुषंगाने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा मार्गदर्शनात आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा नेतृत्वात शहरात आणि ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारामध्ये विश्वासार्हता वाढीस लागावी याकरिता कन्हान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुधवार ला रूट मार्च काढण्यात आला.
कन्हान पोलीस स्टेशन येथुन सुरु झालेला हा रुट मार्च महामार्ग ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , तारसा चौक , सांत नंबर नाका होऊन परत महामार्ग ने गांधी चौक होत कन्हान पोलीस स्टेशन येथे रुट मार्च चे समापन करण्यात आले . रुट मार्च दरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधुन त्यांना निवडणुक संबधाने मार्गदर्शन करण्यात आले व त्यांना निवडणुक कशी शांततेत पार पडेल या बाबत चर्चा करण्यात आली असुन पोलीसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा संदेश दिला आहे.
या रुट मार्च मध्ये ५ अधिकारी , १६ अमलदार आणि सशस्त्र सीमा बलातील ३ अधिकारी व ३० अमलदार सहभागी झाले होते.
On the background of the assembly elections, the Kanhan Police route march communicated with the citizens and the police gave the message to vote fearlessly.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या