Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा व्दारे नवनिर्वाचित खासदार बर्वे यांचा नागरी सत्कार | Newly elected MP Barve was felicitated by Nationalist Congress Party

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा व्दारे नवनिर्वाचित खासदार बर्वे यांचा नागरी सत्कार

कन्हान : - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कन्हान शहर व्दारे रामटेक लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला .

शनिवार (दि.२८) ला सायंकाळी ७.३० वाजता धरमनगर च्या राजराजेश्वरी दुर्गा मंदिर प्रांगणात प्रमुख अतिथी मा.राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष ना. जि.ग्रा.काँ.क , मा.सलिलदादा देशमुख युवा नेते रा.कॉ.प.श.प, मा.किशोर बेलसरे कार्याध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण , मा. प्रकाशभाऊ जाधव माजी खासदार रामटेक , मा.नरेश बर्वे उपाध्यक्ष नागपुर जि.ग्रा.कॉ.क. आदी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा कन्हान शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा द्वारे भव्य नागरी सत्कार करण्यात आला . 

सत्काराच्या उत्तरार्थ खासदार बर्वे यांनी सर्व मतदारांचे आभार व्यकत करून कन्हान नगरपरिषद अंतर्गत धरमनगर , पिपरी , सत्रापुर , आनंद नगर क्षेत्रातील रहि वासियांना शासकीय मालकी हक्काचे पट्टे मिळवुन देण्याच्या अनुषंगाने लवकरच पट्टे विषयी उपविभागिय अधिकारी रामटेक यांच्या सोबत बैठक लावुन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

या प्रसंगी पुरणदास तांडेकर तालुकाध्यक्ष राकापा , ज्ञानेश्वरजी वीघे ज्येष्ठ नेता राकांपा , देवीदास तडस अध्यक्ष युवक राष्ट्रवादी राकांपा विधानसभा , अभिषेक बेलसरे अध्यक्ष कन्हान शहर , सतिश बेलसरे युवा नेता , शंकरराव पडोळे , दूधराम सव्वालाखे जि.प सदस्य , योगेंद्र रंगारी न.प. उपाध्यक्ष , योगिता भलावी , दिपा तिवारी , नगरसेविका रेखा टोहने , राखी परते , नगरसेवक विनय यादव , मनिश भिवगडे , कैलाश खंडार , सुत्तम मस्के , अखिलेष मेश्राम , ज्ञानेश्वर दारोडे , लोकेश डहाके , सोहेल खान , प्रशांत मसार , महेश काकडे , सुशिल कळमकर आदी समस्त पदाधिकारी , महिला आघाडी ,  युवा आघाडी आणि मोठ्या संख्येने नगरवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पाटील कार्याध्यक्ष रामटेक विधानसभा हयानी केले . 

सुत्रसंचालन डॉ. कमलेश शर्मा कार्याध्यक्ष कन्हान शहर यांनी तर आभार सोशल मीडिया तहसिल अध्यक्ष शफीक शेख यांनी मानले .

Newly elected MP Barve was felicitated by Nationalist Congress Party

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या