भव्य कलश , कावड शोभायात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी येथे नवरात्रौत्सवाचा थाटात शुभारंभ
“जय माता दी”, “नवदुर्गा माता की जय” च्या जयघोषाने कन्हान नगरी दुमदुमली
नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : – सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे दुर्गा माता मंदीर पिपरी येथील प्रसिद्ध जागृत दुर्गा माता मंदिरात कन्हान नदी पात्रातील पावन जलाची भव्य कलश , कावड शोभायात्रा काढुन , जल अभिषेक पुजनासह घटस्थापना करून भक्तीमय धार्मिक वातावरणात नवरात्रौत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला .
गुरूवार (दि.३) ऑक्टोंबर २०२४ ला सकाळी ११ वाजता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे दुर्गा माता मंदिर चौक पिपरी - कन्हान येथुन नवकन्या , महिला , भाविकांनी कन्हान नदी पात्रात पूजा अर्चना करून ९५ नवकन्या आणि २६ कावडधारी पुरुष अशा १२१ कलशासह नवदुर्गेचे नऊ रथ , भजन मंडळी , ढोल, ताशे व डिजेच्या मधुर सुरात ” जय माता दी”, ” नवदुर्गा माता की जय ” च्या जयघोषात भव्य कलश , कावड शोभायात्रा बीकेसीपी शाळे पासुन काढुन मुख्य राष्ट्रीय महामार्गाने गांधी चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक होऊन पिपरी मार्गाने ने अशोक नगर , शिवाजी नगर , धरमनगर होत पिपरी नवदुर्गा माता मंदिरात पोहचुन दुर्गे मातेचे पंचामृताने व कलशातील जलाने अभिषेक करून घटस्थापना , विधिवत पूजा अर्चना , आरती करून भक्तीमय धार्मिक वातावरणात नवरात्रौत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला .
यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाने पाणी , शरबत फळ वितरण करून जोरदार स्वागत केले . महिलांनी कलशधारी कन्या , महिला व कावडधारी पुरूष भाविक भक्तांचे पाय धुवुन अक्षदा लावुन फुलांच्या वर्षावात पुजन करित नमन करून भावनिक स्वागत केले . नऊ दिवस भजन , जस गायन , जागरण , गरबासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
गुरूवार (दि.१०) ऑक्टोंबर ला अष्टमी महायज्ञ २१ हवन कुंड पुजन , शुक्रवार (दि.११) ला सायंकाळी ६ वाजता पासुन महाप्रसाद वितरण करण्यात येईल . शनिवार (दि.१२) ला सकाळी ९ वाजता घटविसर्जन आणि सायंकाळी रावण दहन करुन नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल . शोभायात्रेत माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव , पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , विशाल बरबटे , नरेश बर्वे , विजय हटवाकर , राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , राजेश बोपुलकर , कैलास खंडार , समीर मेश्राम , लोकेश बावनकर , प्रभाकर बावणे , जितेंद्रसिंग जम्बे , विजय केवट , विनोद खडसे , दिलीप रायकवार , मोतीराम राहाटे , ऋषभ बावनकर , शुभम बावनकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
नवरात्रौत्सवाच्या यशस्वितेकरिता सार्वजनिक नवदुर्गा उत्स व मंडळ, दुर्गा माता मंदीर चौक पिपरी-कन्हान व्यवस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव , मार्गदर्शक नानकराम मोटवाणी , राधेश्याम भोयर , अजय भोस्कर , वासुसेठ झमतानी , शालिकराम ठाकरे , अशोक मेश्राम , मंडळ अध्यक्ष देवा चतुर , उपाध्यक्ष अमोल सुटे , शितल भिमणवार , सचिव मनोज कुरडकर , प्रशांत मसार , कोषाध्यक्ष प्रमोद मोटवानी , बाला खंगारे , दुर्गेश फुलझेले , सहकोषाध्यक्ष फजित खंगारे , कैलास पवार , विजय खडसे सह समस्त ग्रामस्थ भाविक मंडळी परिश्रम करित आहे .
Navratri festival | Durga Mata Temple Pipri with grand Kalash, Kavad Shobhayatra
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या